AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस सिलिंडरबाबत सर्वात मोठी अपडेट; युद्धामुळे दिल्ली ते गल्ली होरपळली, थेट आकडे आले समोर!

LPG Update : मार्चमध्ये भारतातील LPG च्या वापरात 13 टक्क्यांची मोठी घट झाली. मध्य पूर्वेतील तणावामुळे पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले होते, त्यामुळे ही घट झाली आहे.

गॅस सिलिंडरबाबत सर्वात मोठी अपडेट; युद्धामुळे दिल्ली ते गल्ली होरपळली, थेट आकडे आले समोर!
LPG IMPACTImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 19, 2026 | 3:19 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारतातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये भारतातील LPG च्या वापरात 13 टक्क्यांची मोठी घट झाली. मध्य पूर्वेतील तणावामुळे पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले, ज्याचा परिणाम घरगुती स्वयंपाक तसेच व्यावसायिक गॅसच्या उपलब्धतेवर झाला. मार्चमध्ये LPG चा वापर 2.379 दशलक्ष टन इतका राहिला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 2.729 दशलक्ष टन होता. म्हणजेच गॅसच्या वापरात 12.8 टक्के घट झाली आहे.

LPG पुरवठ्यात घट

भारत आपल्या एकूण वापराच्या 60 टक्के गॅस आयात करतो, यातील बहुतांशी भाग मध्य पूर्वेतून येतो. या युद्धामुळे होर्मुझ मार्ग बंद होता, त्यामुळे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून होणाऱ्या पुरवठ्यात अडथळे आल्यामुळे सरकारने हॉटेल्ससारख्या व्यावसायिक संस्थांना आणि उद्योगांना दिल्या जाणाऱ्या LPG पुरवठ्यात कपात करून घरगुती वापरासाठी लागणारा गॅस पुरवठा वाढवला होता. मात्र तरीही गॅसच्या विक्रीत कपात झाली आहे.

LPG विक्रीत घट

पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अ‍ॅनालिसिस सेल (PPAC) च्या माहितीनुसार, मार्चमध्ये घरगुती ग्राहकांना विकल्या गेलेल्या LPG सिलिंडरमध्ये 8.1 टक्क्यांची घट होऊन ती 2.219 दशलक्ष टन इतकी राहिली. तर गैर-घरगुती वापरकर्त्यांना विक्रीत सुमारे 48 टक्क्यांची घट झाली. PPAC च्या आकडेवारीनुसार विक्री कमी झाली असली तरी सरकारने पुरवठा सामान्य आहे आणि घरगुती मागणी पूर्ण केली जात आहे असा दावा केला. गॅसची कमतरता भरून काढण्यासाठी सरकारने रिफायनरीजना पेट्रोकेमिकल उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या फीडस्टॉकला LPG उत्पादनाकडे वळवण्याचे निर्देश दिले होते. यामुळे मार्चमध्ये घरगुती LPG उत्पादन वाढून 1.4 दशलक्ष टन झाले, जे एक वर्षापूर्वी 1.1 दशलक्ष टन होते.

पेट्रोल आणि डिझेल विक्रीत वाढ

LPG च्या विक्रीत कपात झाली असली तरी पेट्रोल आणि डिझेल विक्रीत चांगली वाढ दिसून आली. पेट्रोल विक्री 7.6 टक्क्यांनी वाढून 3.78 दशलक्ष टन झाली, तर डिझेल विक्री 8.1 टक्क्यांनी वाढून 8.727 दशलक्ष टन झाली. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी ATF विक्री 2 टक्क्यांनी वाढून 9.161 दशलक्ष टन झाली, तर पेट्रोलची विक्री 6.5 टक्क्यांनी वाढून 42.586 दशलक्ष टन झाली.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष