AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff: ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवशी… टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात रॅपिडोकडून मोठा खुलासा

Tiger Shroff Firing Case: अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्याने खळबळ उडालेली असताना आता रॅपिडो कंपनीने अधिकृत निवेदन दिले आहे. कंपनीने त्यांची भूमिका जाहीर केली आहे.

Tiger Shroff: ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवशी... टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात रॅपिडोकडून मोठा खुलासा
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात रॅपिडोकडून मोठा खुलासा
| Updated on: Oct 20, 2026 | 9:10 AM
Share

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी जुहू परिसरात गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला. तीन हल्लेखोरांपैकी दोघांनी टायगरच्या कारच्या दिशेने गोळीबार केला. (Tiger Shroff Car Attack) आरोपींनी सात राऊंड फायर केले होते. एक हल्लेखोर हा बाईकवर बसून होता. हल्ल्यानंतर तीनही हल्लेखोर राज्याबाहेर पळून गेले होते. राजस्थानमधील कोटा येथे या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यातील एक आरोपी ऋतिक कुमार उर्फ रोशन हा मुंबईच्या अंधेरी परिसरातील असल्याचे समोर आले आहे. तो रॅपिडो बाईक चालवायचा. त्यानंतर आता रॅपिडो कंपनीने अधिकृत निवेदन दिले आहे. कंपनीने त्यांची भूमिका जाहीर केली आहे.

रॅपिडोने व्यक्त केली चिंता

टायगर श्रॉफ आणि त्यांच्या टीमसोबत घडलेल्या घटनेबद्दल रॅपिडोकडून चिंता व्यक्त केली. आरोपी असलेली संबंधित व्यक्ती १४ ऑक्टोबरपासून रॅपिडोवर कॅप्टन म्हणून सक्रिय नसल्याचा खुलासा कंपनीने केला आहे. घटनेच्या दिवशी संबंधित व्यक्तीने रॅपिडोच्या सेवेचा ग्राहक म्हणून वापर केल्याची माहिती त्यांनी दिली. भारतातील गिग इकॉनॉमीमध्ये व्यक्ती एकाच वेळी अनेक प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत असू शकतात, असे रॅपिडोने स्पष्टीकरण दिले आहे. तपास यंत्रणांना आवश्यक असलेली सर्व माहिती वेळेत दिल्याचा दावा कंपनीने केला आहे. हिंसाचार आणि गुन्हेगारी कृत्यांना रॅपिडोचे समर्थन नाही, तपासात पूर्ण सहकार्य सुरूच राहणार असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

घटनेच्या दिवशी ग्राहक म्हणून वापर

ज्या दिवशी ही घटना घडली. त्या दिवशी संबंधित व्यक्तीने रॅपिडोच्या सेवेचा वापर कॅप्टन म्हणून नव्हे तर एक ग्राहक म्हणून केला होता, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात संबंधित सर्व आवश्यक माहिती आणि पुरावे यंत्रणांच्या स्वाधीन केल्याचे आणि तपासात संपूर्ण सहकार्य करत असल्याचे रॅपिडोने म्हटले आहे.

आरोपी हा आमच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत होती. पण घटनेच्या दिवशी १४ ऑक्टोबरला तो कॅप्टन नाही तर ग्राहक म्हणून आला होता. भारताच्या गिग इकॉनॉमीमध्ये एखादी व्यक्ती एकाच वेळी अनेक प्लॅटफॉर्मवर नोंदणी करू शकते, ही एक सामान्य बाब आहे. तिने कंपनीच्या सेवेसाठी नोंदणी केली म्हणजे ती त्याच कंपनीशी जोडलेली आहे, असा त्याचा अर्थ होत नसल्याचा खुलासा कंपनीने या निवेदनात दिला आहे.

पोलिसांनी प्रकरणात ऋतिक कुमार उर्फ रोशन, हरियाणाच्या सोनिपत येथील रेहान आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या तिघांच्या चौकशीतून आता टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. जुहू परिसरात टायगर श्रॉफ याच्या वाहनावर संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष