ई-पोर्टलमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी इन्फोसिसचे अधिकारी लागले कामाला, सीईओ म्हणाले…

आयकर विभागाच्या नव्या पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाचे अधिकारी येत्या 22 जूनला इन्फोसिस कंपनीशी संवाद साधणार आहे. (Infosys COO says several e-filing portal glitches resolved Deeply concerned with inconvenience caused)

ई-पोर्टलमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी इन्फोसिसचे अधिकारी लागले कामाला, सीईओ म्हणाले...
income tax
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 8:55 AM

मुंबई : आयकर विभागाचे ई-फाईलिंग पोर्टल सुरु करताना मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, काही दिवसातच या पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी समोर आल्या आहेत. या पोर्टलवर लॉगिन करण्यापासून नोटिसला उत्तर देण्यापर्यंत अनेक अडचणी येत आहेत. आयकर विभागाच्या नव्या पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी इन्फोसिसचे अधिकारी कामाला लागले आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालयाचे अधिकारी येत्या 22 जूनला इन्फोसिस कंपनीशी संवाद साधणार आहे. (Infosys COO says several e-filing portal glitches resolved Deeply concerned with inconvenience caused)

इन्फोसिसचं स्पष्टीकरण

देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. नव्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) काही तांत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक जणांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्ही लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करु, असे इन्फोसिसने म्हटलं आहे.

हे पोर्टल लाँच करण्यामागचे उद्दीष्ट म्हणजे करदात्यांना सर्व गोष्टी अधिक सुलभ करणे हे होते. मात्र पहिल्या दिवसापासून वापरकर्त्यांना या पोर्टलवर काही ना काही तांत्रिक अडचणी येत आहेत, असेही इन्कम टॅक्सह सरकारचेही म्हणणे आहे.

निर्मला सीतारमण यांचा संताप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन पोर्टल डाऊन झाल्याबद्दल संताप व्यक्त करत इन्फोसिसला जाब विचारला आहे. बहुप्रतिक्षित ई-फायलिंग पोर्टल 2.0 सोमवारी रात्री 20.45 वाजता लाँच केलं आहे. नव्या पोर्टलबद्दल अनेक अडचणी समरो आल्या आहेत. इन्फोसिस आणि नंदन निलेकणी तुमच्याकडून दिली जाणारी सेवा गुणवत्तापूर्ण असेल. तुम्ही आमच्या करदात्यांना निराश करणार नाही, अशी आशा देखील सीतारमण यांनी व्यक्त केली.

तसेच या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाने या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले आहे. येत्या 22 तारखेला दिल्लीत ही बैठक पार पडेल. या बैठकीला काही करदाते, लेखापरीक्षकांची शीर्षस्थ संस्था ICAI, ऑडिटर्स आणि काही सल्लागार उपस्थित असतील. यावेळी इन्फोसिसचे अधिकारी त्यांच्या शंकांचे निरसन करतील.

इन्फोसिस कंपनीला देण्यात आले होते प्रोजेक्ट

मोदी सरकारने ई-फायलिंग पोर्टल तयार करण्याची जबाबदारी इन्फोसिस कंपनीकडे सोपवली होती. इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी 63 दिवसांचा अवधी लागतो. ही प्रक्रिया एका दिवसात पार पाडण्यासाठी इन्फोसिसला या पोर्टलची जबाबदारी देण्यात आली होती.

7 जूनला सुरु झाले होते पोर्टल

www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात आहे. (Infosys COO says several e-filing portal glitches resolved Deeply concerned with inconvenience caused)

संबंधित बातम्या : 

Swiss bank मधील भारतीयांच्या वाढत्या पैशांचं वृत्त केंद्र सरकारने फेटाळलं, बँकेकडे पुरावे मागितले

आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी, काय आहेत नवे नियम, कधीपासून लागू होणार?

Share Market: ‘या’ बड्या कंपनीच्या शेअरची किंमत होणार शून्य, कारण…

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.