LIC IPO: आयपीओसाठी अर्ज करायचाय? अहो मग आपलं किराणा दुकान आहे ना!

देशभरातील किराणा दुकानांवर क्यूआर कोड्स लावले आहेत. या क्यूआर कोड्सचा वापर करून तुम्हाला सहजपणे डिमॅट खाते उघडता येईल. डिमॅट खाते शेअर बाजारातील ट्रेडिंगसाठी अनिवार्य असते. हे खाते उघडून लोक एलआयसी आयपीओसाठी (LIC IPO) बोली लावू शकतील.

LIC IPO: आयपीओसाठी अर्ज करायचाय? अहो मग आपलं किराणा दुकान आहे ना!
आता किराणा दुकानांतून सहजपणे एलआयसी आयपीओत करा गुंतवणूकImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 12:20 PM

एलआयसी आयपीओत (LIC IPO) तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, तर काय करावे लागेल असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यांचं साधं सोपं उत्तर म्हणजे तुमच्या शेजारच्या किराणा दुकान (Kirana Shoppy) जा, असं आहे. आता तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी आम्हीच भेटलो काय गंडवायला. तर मित्रांनो तुम्हाला अगदी किरणा दुकानातून नवीन सुविधेमुळे एलआयसी आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. पेटीएम ब्रॅण्डची आघाडीची डिजिटल पेमेंट्स व वित्तीय सेवा कंपनी वन-97 (One-97) हिने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पेटीएम मनी (Paytm Money), एलआयसी आयपीओ किरकोळ दुकानांमध्ये घेऊन जाण्यास सज्ज आहे. कंपनीने देशभरातील किराणा दुकानांवर क्यूआर कोड्स (QR code) लावले आहेत. हे क्यूआर कोड्स वापरून कोणतीही व्यक्ती सुलभतेने आपले डिमॅट खाते (Demat Account) उघडू शकेल. डिमॅट खाते शेअर बाजारातील ट्रेडिंगसाठी (Share Market Trading) अनिवार्य असते. हे खाते उघडून लोक एलआयसी आयपीओसाठी बोली लावू शकतील.

मोफत डिमॅटची लाट येणार

एलआयसी आयपीओसाठी भागीदारी असलेल्या दुकानांमध्ये पेटीएम क्यूआर कोड्स लावणार आहे. यामुळे गुंतवणूकदार आयपीओसाठी सहज अर्ज करू शकतील. या उपक्रमामुळे लोकांना मोफत डिमॅट खाती उघडता येतील आणि देशात मोफत डिमॅट खाते उघडण्याची लाट येईल. यूपीआयमार्फत 5 लाख रुपयांपर्यंतच्या चढ्या बोली लावण्याची मुभा देणारा पेटीएम मनी हा देशातील पहिला डिस्काऊंट ब्रोकर ठरला आहे. याशिवाय रिटेल गुंतवणूकदार प्रवर्गाशिवाय एलआयसी आयपीओकरता अर्ज करण्यास पात्र असलेल्या पॉलिसीधारकांसाठी कंपनीने स्वतंत्र प्रवर्ग निर्माण केला आहे.

हे सुद्धा वाचा

पेटीएम मनीच्या माध्यमातून असा करा एलआयसी आयपीओसाठी अर्ज

  1. पेटीएम मनीच्या होम स्क्रीनवरील आयपीओ विभागावर जा.
  2. प्राधान्यानुसार गुंतवणूकदाराचा प्रकार निवडा. 5 लाख रुपयांहून अधिक बोली लावण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती एचएनआय प्रवर्गाचा पर्याय निवडून हे करू शकतात.
  3. जर तुम्ही विमाधारक असाल तर आयपीओ डिटेल्स या पेजवर ‘इन्व्हेस्टर टाइप’ खाली जाऊन पॉलिसी होल्डर्स निवडा. याशिवाय तुमचा पॅन एलआयसी पॉलिसीशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
  4. आयपीओमधील ‘करंट अँड अपकमिंग’ टॅबमध्ये एलआयसी आयपीओ हा पर्याय उपलब्ध असेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘ॲप्लाय नाऊ’ हे बटन दिसेल, ते बटन तुम्हाला बिड पेजकडे घेऊन जाईल. या पेजवर तुम्ही दर अद्ययावत करू शकता किंवा तुमच्या अर्जावरील संख्या नोंदवू शकता. ॲड यूपीआय डिटेल्स’ विभागात तुमचा यूपीआय आयडी अद्ययावत करा आणि ‘ॲप्लाय’वर क्लिक करा.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.