Akshaya Gold : सोन्याचे ‘अक्षय’ गिफ्ट! गेल्या 11 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Akshaya Gold : सोन्याने ग्राहकांना अक्षय परतावा दिला. गेल्या 11 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल झाले. मागील आकडेवारीवर नजर टाकली तर ग्राहकांना मोठा फायदा झाला.

Akshaya Gold : सोन्याचे 'अक्षय' गिफ्ट! गेल्या 11 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल
अक्षय धन
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 5:25 PM

नवी दिल्ली : अक्षय तृतीयेला सोने (Akshaya Tritiya Gold) खरेदी केले तर ते अक्षय असते. म्हणजे हे सोने वृद्धीगंत होते, अशी मान्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून ग्राहकाने अक्षय तृतीयेला सोने खरेदी केले असेल तर त्यांना 19.67 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला 3 मे रोजी अक्षय तृत्तीया होती. यादिवशी सोन्याचा भाव 50,808 रुपये प्रति तोळा होता. अजून मे महिन्या येण्यास 15 दिवसांचा कालावधी बाकी आहे. यंदा 22 एप्रिल रोजी अक्षय तृत्तीया आहे. सोन्याचा भाव यावेळी 61,000 रुपयांच्या घरात आहे. म्हणजे ग्राहकांचा जवळपास 10,000 रुपयांचा फायदा झाला आहे. चांदीने या काळात जवळपास 20 टक्के परतावा दिला आहे. सोन्याने ग्राहकांना अक्षय परतावा (High Return) दिला आहे.

चांदीने केली चांदी 3 मे 2022 रोजी अक्षय तृत्तीयेला चांदीचा भाव 63,049 रुपये किलो होती. आज 14 एप्रिल 2023 रोजी चांदीचा भाव 79,600 रुपये किलो आहे. म्हणजे एक वर्षाच्या आता चांदीने ग्राहकांना एका किलोमागे 16,551 रुपयांचा फायदा मिळवून दिला आहे. ग्राहकांची चांदी झाली आहे. सोन्यापेक्षा चांदीने अधिक परतावा दिला आहे.

11 वर्षांत भाव डबल

हे सुद्धा वाचा
  1. गेल्या 11 वर्षांतील भावांवर नजर टाकल्यास किती फायदा झाला हे स्पष्ट होईल. सोन्याचा भाव डबल झाला आहे.
  2. 24 एप्रिल 2012 रोजी अक्षय तृत्तीयेला सोन्याचा भाव 29,030 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
  3. 13 मे 2013 रोजी अक्षय तृत्तीयेला एक तोळा सोन्याचा भाव 29,865 रुपये होता
  4. एका वर्षांत ग्राहकांना केवळ 2.88 टक्क्यांचा परतावा मिळाला
  5. चांदीने या काळात ग्राहकांना फटका दिला. चांदी जवळपास 19 टक्क्यांनी स्वस्त झाली
  6. चांदी 56,697 रुपयांहून 45,118 रुपये किलो झाली. 10,579 रुपये प्रति किलोने चांदी स्वस्त झाली

कोरोना काळात वाढला भाव

  1. 6 मे 2019 ते 24 एप्रिल 2020 या काळात सोन्याने 47.41 टक्के उसळी घेतली
  2. सोने 31,563 रुपये प्रति तोळ्याहून 46,527 रुपये प्रति तोळ्यावर पोहचले
  3. किंमतीत प्रति 10 ग्रॅम 14,964 रुपयांचा फायदा झाला
  4. 24 एप्रिल 2020 ते 14 मे 2021 या काळात चांदीत 69 टक्के वाढ झाली
  5. चांदी 42,051 रुपयांहून थेट 71,085 रुपये किलो झाली
  6. चांदीच्या किंमतीत एकाच वर्षात तब्बल 29,034 रुपयांचा फायदा झाला

गेल्या 100 दिवसांत सोन्याने दिला 9 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा

  1. 30 डिसेंबर 2022 रोजी, वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 55,017 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
  2. 10 ​एप्रिल 2023 रोजी म्हणजे 100 दिवसानंतर सोन्याचा भाव 5,021 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला
  3. याचा सरळ अर्थ ग्राहकांना 100 दिवसांत सोन्याने 5,021 रुपयांचा फायदा झाला
  4. सोन्याने या 100 दिवसांत गुंतवणूकदारांना 9.12 टक्के कमाई करुन दिली
  5. या 100 दिवसांत सोन्याच्या भावात प्रति तोळा 473 रुपयांची घसरण पण दिसून आली
  6. सोमवारी व्यापारी सत्रात सोन्याचा भाव 59,912 रुपये प्रति तोळा होता

Non Stop LIVE Update
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.