AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel युद्धाची भारताला झळ; शेअर बाजारवरच परिणाम नाही तर महागाई भडकणार?

Iran-Israel War : इराणने मंगळवारी मध्यरात्री इस्त्रायलवर हल्ला चढवला. या चढाईने जगाला पुन्हा संकटात टाकले आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्थांना नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. भारतावर पण त्याचे दुष्परिणाम दिसण्याची शक्यता आहे. महागाई भडकेल काय?

Iran-Israel युद्धाची भारताला झळ; शेअर बाजारवरच परिणाम नाही तर महागाई भडकणार?
इराण-इस्त्रायल युद्धाने महागाई भडकणार?
| Updated on: Oct 02, 2024 | 2:32 PM
Share

इराण आणि इस्त्रायल या दोन देशात अटीतटीचा सामना सुरू झाला आहे. मध्य-पूर्वेत वर्चस्ववादाची लढाई अनेकांचा जीव घेणारी आहे. या युद्धामुळे 1949 चे दिवस पुन्हा परतल्याची जाणीव आखातातील देशांना पण होत आहे. इराण आणि इस्त्रायल युद्धात इतर राष्ट्रांनी उडी घेतली तर मोठे अराजक माजण्याची परिस्थिती आहे. हे युद्ध इस्त्रायल, इराण आणि लेबनॉन यांच्यात लवकर संपले तर जग सुटकेचा निश्वास सोडेल. पण तशी शक्यता धूसर आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्थांना नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. भारतावर पण त्याचे दुष्परिणाम दिसण्याची शक्यता आहे. महागाई भडकेल काय?

भारतात महागाईचा भडका?

इराण-इस्त्रायल युद्धाचा सर्वात जास्त फटका भारताला बसण्याची भीती आहे. महागाई भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण भारत आजही कच्चा इंधनासाठी, पेट्रोल-डिझेलसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. इंधनातील 80 टक्के वाटा हा परदेशाचा आहे. युद्ध भडकल्याने त्याचा थेट परिणाम कच्चा तेलावर होईल. पेट्रोलियम पदार्थ महागतील. परिणामी देशातंर्गत दळणवळण महाग होईल. इतर वस्तू महागतील.

मंगळवारी या हल्ल्याचा परिणाम कच्चा तेलाच्या किंमतीवर दिसून आला. क्रूड ऑईलची किंमत 4 टक्क्यांनी उसळल्या. ब्रेंट फ्यूचरचा भाव 3.5 टक्क्यांनी वाढून तो 74.2 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. तर अमेरिका वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ऑईल 2.54 डॉलर म्हणजे 3.7 टक्क्यांनी वाढून 70.7 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले.

रेपो रेटवर काय परिणाम?

इराण-इस्त्रायल युद्धाचा थेट परिणाम रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटवर दिसून येईल. RBI ची पतधोरण समितीची बैठक पुढील आठवड्यात होत आहे. त्यात रेपो रेट कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आतापर्यंत व्यक्त होत होती. पण या ताज्या अपडेटमुळे केंद्रीय बँकेपुढे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात याविषयीचे चित्र स्पष्ट होईल.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात व्याज दरात कपात केली. चीनने अर्थव्यवस्था सुधारणेसाठी 142 अब्ज डॉलरचे बेलआऊट पॅकेज जाहीर केले. महागाईत वाढ होऊ नये, यासाठी हा प्रपंच चीन सरकारला करावा लागला. इतर अनेक देश सुद्धा महागाई आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. महागाई भडकू नये यासाठी आरबीआयला फैसला करावा लागणार आहे.

भारतात ऐन सणासुदीचा कालावधी सुरू होत असतानाच मध्य-पूर्वेत आगीच्या ज्वाला भडकत असल्याने केंद्र सरकारसह आरबीआयला मोठी उपाय योजना करावी लागणार आहे. सध्या तेजीत आलेला शेअर बाजार, सोने आणि चांदी याच्यावर परिणाम होऊ शकतो. तर रिअल इस्टेटवर परिणाम दिसू शकतो. खाद्यतेलाच्या किंमती भडकू नये यासाठी सरकारला प्रयत्न करावा लागणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?