AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Penalty : 5 रुपयांची हाव नडली, कंत्राटदाराला 1 लाखांचा ठोठावला दंड..

Penalty : पाण्याच्या बॉटलमागे कमाईची हाव कंत्राटदाराला चांगलीच नडली..

Penalty : 5 रुपयांची हाव नडली, कंत्राटदाराला 1 लाखांचा ठोठावला दंड..
कंत्राटदाराला फटकाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 17, 2022 | 6:37 PM
Share

नवी दिल्ली : ‘जागो ग्राहक जागो’ या जाहिरातीच्या माध्यमातून केंद्र सरकार (Central Government) जनतेला सतत जागरुक करत असते. अनेकदा दुकानदार, कंत्राटदार ग्राहकांची लूट करतात. त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दाम वसूल (Maximum Retail Price-MRP) करतात. प्राईस टॅगपेक्षा ग्राहकांकडून अधिक रक्कम वसूल करण्यात येते. एवढेच नाही तर दुकानदारांनाही अशी लूट न करण्याची तंबी देण्यात येते. पण अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. 5-10 रुपयांची हाव त्यांना चांगलाच दंडम घडवते, हे नक्की.

IRCTC च्या एका कंत्राटदाराला याचा चांगलाच भूर्दंड सहन करावा लागला आहे. बाटलीबंद पाण्याची विक्री करताना एमआरपीपेक्षा अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा मोह त्याला नडला. त्याने प्रत्येक सीलबंद पाण्याच्या बाटलीवर 5 रुपये अतिरिक्त वसूलीचा धडका लावला होता. त्याला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

भारतीय रेल्वेच्या अंबाला विभागात ही लूट होत होती. HT ने दिलेल्या वृत्तानुसार, IRCTC चा परवानाधारक कंत्राटदार चंद्र मौली मिश्रा यांच्याविरोधात ही तक्रार देण्यात आली होती. ते प्रत्येक सीलबंद पाण्याच्या बाटलीवर 5 रुपये अतिरिक्त वसूल करत असल्याची तक्रार होती. एका प्रवाशाने ही तक्रार केली होती.

या कंत्राटदाराकडे लखनऊ-चंदीगड-लखनऊ या रेल्वेत खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या पुरविण्याचे कंत्राट आहे. या ट्रेनमध्ये पेंट्री विभाग नाही. त्यामुळे प्रवाशांना कंत्राटदाराकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करावे लागतात. गुरुवारी शिवम भट्ट नावाच्या प्रवाशाने या लूटीचा व्हिडीओ ट्विटरवर (Twitter) शेअर केला होता. त्यानंतर ठेकेदाराविरोधात कारवाई झाली.

शिवम हा चंदीगड ते शाहजहांपूर या दरम्यान प्रवास करत होता. तेव्हा त्याने या कंत्राटदाराकडून पिण्याच्या पाण्याची बॉटल खरेदी केली. त्यावर ₹15 एमआरपी होती. पण कंत्राटदाराने त्याच्याकडून 20 रुपये वसूल केले. त्याविरोधात प्रवाशाने तक्रार दाखल केली. त्यानंतर व्यवस्थापकाला अटक करण्यात आली.

तक्रारीआधारे लखनऊचे डीआरएण मनदीप सिंह भाटिया यांनी दंड लावण्याची शिफारस केली. त्यांनी कंत्राटदाराच्या कागदपत्रांची तपासणी केली. चौकशीअंती कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.