AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा घर खरेदी करणे फायद्याचं की तोट्याचं?

घर खरेदीलाही घरघर लागलेली दिसली. मात्र, 'संकटात संधी असते' या वाक्याप्रमाणे काही लोक घर खरेदीसाठी हाच काळ चांगला मानत आहेत.

यंदा घर खरेदी करणे फायद्याचं की तोट्याचं?
| Updated on: Jan 15, 2021 | 11:47 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाने अर्थव्यवस्था कोलमडली आहे. एकही असं क्षेत्र नाही जे कोरोनाच्या तडाख्यातून सुटलं असेल. यात बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राचाही समावेश आहे. त्यामुळेच घर खरेदीलाही घरघर लागलेली दिसली. मात्र, ‘संकटात संधी असते’ या वाक्याप्रमाणे काही लोक घर खरेदीसाठी हाच काळ चांगला मानत आहेत. या काळात घरांच्या किमती कमी झाल्याचं सांगत ते असे व्यवहार करताना दिसत आहेत. मात्र, खरंच अशी घर खरेदी फायद्याची की तोट्याची असा प्रश्न अनेकांना पडलाय. याच प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा आढावा (Is is right to buy a house in Year 2021 Loss or Profit).

इंडिया रिअल इस्टेट रिपोर्ट 2020 च्या एका सर्वेनुसार 89 टक्के लोकांनी 2021 या वर्षात संपत्ती खरदी करणं योग्य असल्याचं म्हटलंय. रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म नो ब्रोकर.कॉमने हा सर्वे केला होता. नो ब्रोकर देशातील प्रत्येक मोठ्या शहरात काम करते.

कोरोना विषाणू संसर्गानंतरही घरांच्या विक्रीत वाढ होण्यास सुरुवात

विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचंही समोर आलंय. नोकरी किंवा व्यवसाय करणारे तरुण देखील घर खरेदी करणं पसंत करत असल्याचं समोर येतंय. अनेक तरुण आपलं स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याबाबत केलेल्या सर्व्हेत 25 ते 40 वर्षांच्या वयातील 63 टक्के लोक आपलं घर खरेदी करण्यास इच्छूक आहेत. मागील वर्षी हा आकडा 49 टक्के होता.”

प्रॉपर्टी कन्सल्टंट जेएलएल इंडियाच्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान घर खरेदीत 51 टक्क्यांची वाढ झालीय. घर खरेदी करण्याच्या प्रमाणात सर्वाधिक वाढ महाराष्ट्रात पुणे शहरात पाहायला मिळाली. या वाढीचा वेग 147 टक्क्यांपर्यंत आहे. जेएलएलच्या अहवालानुसार देशातील प्रमुख 7 शहरांमधील घरांच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार घर खरेदीत वेगाने वाढ होतेय. या शहरांमध्ये मुंबई, बंगळुरू, दिल्ली, पुणे, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद या शहरांचा समावेश आहे.

एनेरॉक प्रॉपर्टी कंसल्टंटचा अहवाल देखील घर खरेदीतील वाढीकडेच बोट करतोय. त्यांच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान 7 शहरांमध्ये 50 हजार 900 घरांची विक्री झालीय.

हेही वाचा :

PNB आणि SBI बँकेकडून मालमत्तांचा लिलाव; घर आणि दुकाने स्वस्तामध्ये खरेदी करण्याची नामी संधी

SRA च्या 13 हजार बेकायदा रहिवाशांना 48 तासाची मुदत, पुरावे न दिल्यास घरं सोडावी लागणार

मुंबईकरांचं उत्पन्न की घरांच्या किमती, सर्वाधिक वाढ कशात?

व्हिडीओ पाहा :

Is is right to buy a house in Year 2021 Loss or Profit

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.