ITR Filling last Date: आयकर रिटर्न भरण्याची काय आहे शेवटची तारीख? करदात्यांसाठी खास माहिती

ITR Filling Date: आयटीआर भरण्याची अंतिम मुदत करदात्यांसाठी वेगवगेळी असते. सध्याच्या आयकर कायद्यांनुसार, व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. सरकार यामध्ये मुदतवाढ देऊ शकते . आयटीआर फाइलिंगसाठी संबंधित आर्थिक वर्ष आणि मूल्यांकन वर्ष यांच्यातील फरक करदात्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.

ITR Filling last Date: आयकर रिटर्न भरण्याची काय आहे शेवटची तारीख? करदात्यांसाठी खास माहिती
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Jul 03, 2022 | 1:49 PM

करदात्यांनी(Taxpayer) आयकर विवरण पत्र(Income Tax Return) वेळेच्या आत भरणे आवश्यक आहे. त्यामुळे कारवाई आणि दंड (Penalty) दोन्ही टाळता येते. आयकर विवरण पत्र (ITR) भरण्यासाठी बरेच करदाते चालढकल करतात. अजून वेळ आहे, इतक्या लवकर भरून काय तीर मारायचा आहे? अशी मानसिकता असते. पण वेळेवर तांत्रिक अडचणी आल्या की, त्यांची तारांबळ उडते. महत्वाचे काम सोडून आयटीआर भरण्यासाठी धावाधाव करावी लागते. काही तांत्रिक बिघाडामुळे रिटर्न वेळेच्या आत भरता येत नाही. कालमर्यादा(Time Bond) संपल्यानंतर आयटीआर दाखल केल्यास, आयकर कायदा (Income Tax Act), 1961 च्या कलम 234A अंतर्गत व्याज तर लागतेच पण दंड ही आकारल्या जातो. त्यामुळे अंगलटंगल न करता वेळेच्या आता आयकर विवरण पत्र भरले तर तुमच्यावरील कारवाई टळू शकेल आणि वेळेत आयटीआर न भरल्यामुळे होणारा नाहकचा मनस्ताप ही तुम्ही वाचवू शकाल.

काय आहे अंतिम तारीख?

आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वेगवेगळ्या करदात्यांसाठी बदलते. आयकर कायद्यांनुसार, व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी (HUFs) ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. सरकार यामध्ये मुदतवाढ ही देऊ शकते. ज्यांच्या खात्याचे लेखापरीक्षण करणे गरजेचे नाही, अशा सर्व व्यक्तींसाठी 31 जुलै ही अंतिम तारीख आहे. तर ज्या करदात्यांच्या खात्याचे लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे, अशा करदात्यांना आयटीआर भरण्याची तारीख 31 ऑक्टोबर ही आहे. तर ज्या करदात्यांना कलम 92 ई नुसार, अहवाल सादर करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर आहे.

आर्थिक वर्षांचा काय आहे हिशेब?

आयटीआर फाइलिंगसाठी संबंधित आर्थिक वर्ष (Fiscal Year) आणि मूल्यांकन वर्ष (Audit Year) यांच्यातील फरक करदात्यांनी समजून घ्यायला हवा. आर्थिक वर्ष म्हणजे ज्यात करदाता कमाई करतो. तर मूल्यांकन वर्ष म्हणजे आर्थिक वर्षानंतरचे वर्षे, या वर्षात करदात्याच्या मिळकतीचे मूल्यांकन केले जाते. AY हे वर्ष आहे ज्यामध्ये तुम्ही मागील आर्थिक वर्षासाठी तुमचा ITR दाखल करता. उदाहरणार्थ, आर्थिक वर्ष 2021-22 साठी, मूल्यांकन वर्ष 2022-23 आहे. या वर्षी तुम्ही आर्थिक वर्ष 2021-22 किंवा मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी ITR दाखल कराल.

सरकारकडून मुदतवाढीची घोषणा नाही

सध्या सरकारने ITR दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केलेली नाही.त्यामुळे आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23) साठी ITR या 31 तारखेला किंवा त्यापूर्वी दाखल करणे आवश्यक असल्याचे TaxBuddy.com चे संस्थापक आणि माजी IRS अधिकारी सुजित बांगर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

काय आहे दंड?

आयकर कायदा हा अंतिम मुदतीनंतरही व्यक्तींना आयटीआर फाइल करण्याची परवानगी देतात. अंतिम मुदतीनंतर दाखल केलेल्या आयटीआरला विलंबित आयटीआर म्हणतात. उशीरा आयटीआर दाखल केल्याने दंड लागतो. 31 जुलैनंतर आयटीआर दाखल केल्यास, 5,000 रुपये विलंब शुल्क आकारले जाते. हे विलंब भरण्याचे शुल्क कलम 234F अंतर्गत आकारले जाते. कमी उत्पन्न प्राप्त करदात्यांना म्हणजे 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न प्राप्त कर दात्यांना विलंब केल्यास एक हजार रुपये दंड द्यावा लागतो.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें