AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL auction: जेफ बेझोस, मुकेश अंबानी आमने-सामने; कोण मारणार बाजी?

आयपीएल प्रसारणाचे हक्क मिळवण्यासाठी बड्या उद्योजकांमध्ये स्पर्धा असल्याचे पहायला मिळत आहे. या लिलाव प्रक्रियेत जगातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस आणि मुकेश अंबांनी देखील सहभागी होणार आहेत.

IPL auction: जेफ बेझोस, मुकेश अंबानी आमने-सामने; कोण मारणार बाजी?
| Updated on: Jun 10, 2022 | 2:54 PM
Share

मुंबई : जगातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस (Jeff Bezos) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यात पुन्हा एकदा स्पर्धा होणार आहे. मात्र यावेळी ही स्पर्धा प्रसारमाध्यमांच्या हक्कासाठी असणार आहे. ‘आयपीएल’ला क्रिकेटचे महाकुंभ म्हणून ओळखले जाते. आयपीएल (IPL) जगात सर्वाधिक लोकप्रिय बनले आहे. अनेक जण आयपीएल मोठ्या आवडीने पहात असतात. जगामध्ये जवळपास साठ कोटी लोक आयपीएल पाहातात. साहाजिकच आयपीएल प्रसारणाचे हक्क मिळवण्यासाठी बड्या उद्योजकांमध्ये स्पर्धा असते. आयपीएल प्रसारणाचा हा व्यवसाय सहा अब्ज डॉलरपेक्षा अधिक मोठा आहे. येत्या 12 जून रोजी आयपीलच्या प्रासारण हक्काचा लिलाव होणार आहे. यासाठी जेफ बेझोस आणि मुकेश अंबानी हे दोघेही आपली दावेदारी दाखल करणार आहेत. बोली कितीची लागणार आणि या लिलावात कोण बाजी मारणार हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लिलावात बड्या कंपन्या होणार सहभागी

अ‍ॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी या दोघांना देखील आयपीएलच्या प्रसाररणाचे हक्क विकत घेण्याची इच्छा आहे. बेझोस आणि अंबांनी यांच्या व्यतिरिक्त देखील अनेक मीडिया हाऊस आणि कंपन्या या लिलावात सहभागी होण्याची शक्यता आहे. ‘इकोनॉमिक्स टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार या लिलावात वाल्ट डिझनी कंपनी आणि सोनी ग्रुप देखील सहभागी होणार आहे. या लिलाव प्रक्रियेत अनेक बड्या कंपन्या सहभागी होणार असल्याने लिलावाचे मूल्य वाढण्याची शक्यता आहे.

उच्च प्रोफाइल अधिकाऱ्यांची नियुक्ती

ज्या कंपनीला आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क मिळतील साहाजिकच त्या कंपनीचा भारतीय ग्राहक बाजारपेठेमधील दबदबा वाढणार आहे. सध्या ऑनलाईन मीडियाचा प्रसार वेगाने होत आहे. ज्या कंपनीला आयपीएल प्रसारणाचे हक्क प्राप्त होतील त्या कंपनीला ऑनलाईन प्लॅटर्फामवर देखील फायदा होणार आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार आयपीएल लिलावाच्या पार्श्वभूमीवर मुकेश अंबांनी यांच्याकडून अनेक उच्च-प्रोफाइल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.