जेवार विमानतळ ग्रेटर नोएडाचे भाग्य बदलणार? पहा काय म्हणतात तज्ज्ञ

| Updated on: Nov 27, 2021 | 6:15 AM

जेवरमध्ये प्रस्तावित असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर  नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील प्रॉपर्टीचे दर हे वाढणार असल्याचा अंदाज रियल इस्टेट कंपन्या आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

जेवार विमानतळ ग्रेटर नोएडाचे भाग्य बदलणार? पहा काय म्हणतात तज्ज्ञ
Follow us on

नवी दिल्ली : जेवरमध्ये प्रस्तावित असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर  नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील प्रॉपर्टीचे दर हे वाढणार असल्याचा अंदाज रियल इस्टेट कंपन्या आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याबाबत बोलताना रियल इस्टेट कंपन्यांकडून सांगण्यात आले की,  जेव्हा या विमानतळाचे काम पूर्ण होईल तेव्हा नोएडामधील प्रॉपर्टीचे दर हे गुरुग्रामच्या प्रॉपर्टीच्या पटीमध्ये वाढतील. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले. हे आशियामधील सर्वात मोठे विमानतळ असल्याचा दावा करण्यात येत आहे.

याबाबत बोलताना औद्योगिक संघटना ‘क्रेडाई’ दिल्ली एनसीआरचे अध्यक्ष पंकज बजाज यांनी म्हटले आहे की, हा एक नोए़डासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही अशा एका मोठ्या प्रकल्पाची वाट पाहात होतो. आता जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील पहिल्या क्रमांकाचे मोठे विमानतळ नोएडामध्ये होत आहे. या विमानतळामुळे शहरात विकासाची गंगा येईल. सर्व सोईसुविधांचा विकास होण्यास मदत होईल, व स्थानिक उद्योगांना चालना मिळेल.

…म्हणून जमिनीचे भाव वाढणार

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, नोएडाच्या तुलनेमध्ये गुरुग्राम हे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळाच्या जवळ आहे. त्यामुळे भारतात जेवढ्या काही आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. ते आपल्या कंपन्यांसाठी किंवा त्यांच्या कार्यालयासाठी गुरुग्रामचीच निवड करतात. त्यामुळे तेथील जागेला चांगली मागणी आहे. त्या भागाचा विकास झाला आहे. मात्र आता नोएडामध्ये विमानतळ झाल्यास अनेक कंपन्या भविष्यकाळात  नोएडाचा विचार करू शकतात. नोएडामध्ये कंपन्या आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. तसेच जागतिक दर्जाच्या सेवासुविधांची निर्मिती देखील होईल.

आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ असल्याचा दावा

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आशिया खंडातील सर्वात मोठे तर जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ असल्याचा दावा योगी सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच हे विमानतळ अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असेल, विमानतळाचा परिसर नेहमी प्रदूषमुक्त राहील याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती देखील उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. या विमानतळावर कार्गो सेंटर बनवण्यात येणार असून त्याची क्षमता 20 लाख मॅट्रीक टन एवढी असणार आहे. विमानतळाच्या पुढच्या टप्प्यांमध्ये या कार्गो सेटंरची क्षमता वाढवून ती 80 लाख मॅट्रीक टन एवढी करण्यात येणार आहे.

जागतिक दर्जाच्या सुविधा

हे विमानतळ जगातील एक प्रमुख आंतराष्ट्रीय विमानतळ असून, विमातळावर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विमानतळ परिसरामध्ये मेट्रो स्टेशन, रेल्व स्टेशन, बस स्टेशन देखील उभारण्यात येणार आहेत. या परिसरात रुग्णालये व इतर सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विमानतळाला प्रस्तावित असलेल्या वारानसी- दिल्ली हायस्पीड रेल्वेला जोडण्याचे देखील नियोज असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

एक लाख रोजगाराची निर्मिती

याबाबत बोलताना हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, हा केंद्र सरकारचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पामुळे उत्तप्रदेशात विकासाची गंगा येणार असून, भारताची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे, या प्रोजेक्टमधून जवळपास एक लाख लोकांना रोजगार मिळेल.

संबंधित बातम्या

शेअर बाजारात घसरण; चालू आठवड्यात कोट्यावधीचे नुकसान, आयटी क्षेत्रात गुंतवणुकीचा तज्ज्ञांकडून सल्ला

शेअरबाजारात भूंकप! सेन्सेक्स 1420 अंकांनी कोसळला, गुंतवणुकदाराना कोट्यावधीचा फटका

महाराष्ट्रातल्या मराठी उद्योगपतीच्या घरातला वाद कसा मिटणार? किर्लोस्करांना सुप्रीम कोर्टानं मार्ग दाखवला