June Retail Inflation: महागाईच्या आघाडीवर दिलासादायक बातमी, जूनमध्ये किरकोळ महागाई घटली

त्याचबरोबर मे महिन्यात इंडिया औद्योगिक आऊटपूटमध्ये (IIP) वार्षिक आधारावर 29.27 टक्के वाढ नोंदली गेली. ही माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) सामायिक केली आहे.

June Retail Inflation: महागाईच्या आघाडीवर दिलासादायक बातमी, जूनमध्ये किरकोळ महागाई घटली
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 9:53 PM

नवी दिल्लीः June Retail Inflation: जून महिन्यात भारताचा किरकोळ चलनवाढ दर 6.26 टक्क्यांवर घसरलाय. मेच्या तुलनेत यामध्ये थोडा दिलासा मिळालाय. किरकोळ महागाई दर मेमध्ये 6.30 टक्के होता. त्याचबरोबर मे महिन्यात इंडिया औद्योगिक आऊटपूटमध्ये (IIP) वार्षिक आधारावर 29.27 टक्के वाढ नोंदली गेली. ही माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) सामायिक केली आहे. (June Retail Inflation: Reassuring news on the forefront of inflation, retail inflation declined in June)

किरकोळ महागाईसाठी 4 टक्के उद्दिष्ट ठेवले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने किरकोळ महागाईसाठी 4 टक्के उद्दिष्ट ठेवलेय. त्यामध्ये 2 टक्क्यांची घसरण आणि वाढ झालीय. अशा परिस्थितीत किरकोळ महागाईने आरबीआयच्या 6 टक्क्यांच्या वरच्या क्षेत्राचा टप्पा ओलांडला, तेव्हा सलग दुसऱ्या महिन्यात ही घटना घडली. त्याआधी सलग पाच महिन्यांपर्यंत किरकोळ चलनवाढीचा दर 6 टक्क्यांच्या आत होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्च 20206 मध्ये किरकोळ चलनवाढीचे 4 टक्के (+/- 2%) लक्ष्य ठेवण्याचे उद्दिष्ट्य आहे.

हा डेटा RBIच्या धोरण बनविण्यासाठी आवश्यक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पॉलिसी बनविण्यासाठी किरकोळ चलनवाढीचा डेटा खूप महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन तो चलनविषयक धोरणाबाबत निर्णय घेतो. रिझर्व्ह बँकेची एमपीसी बैठक गेल्या महिन्यात घेण्यात आली होती, ज्यात सलग सहाव्या वेळी पॉलिसी दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास वारंवार म्हणतात की, कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण सातत्याने नव्या पद्धती अवलंबत आहोत.

चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचे लक्ष्य 5.1 टक्के आहे

भारतीय रिझर्व्ह बँकेने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई 5.1 टक्क्यांपर्यंत वाढविलीय. त्यानुसार जूनच्या तिमाहीत किरकोळ महागाई 5.2 टक्के, सप्टेंबरच्या तिमाहीत 5.4 टक्के, डिसेंबर तिमाहीत 4.7 टक्के आणि मार्च तिमाहीत 5.3 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

कच्च्या तेलाची वाढ ही चिंतेची बाब

आरबीआय चालू आर्थिक वर्षातील महागाईचे लक्ष्य वाढवू शकते. ज्या पद्धतीने कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे, तर दुसरीकडे सरकार कर वाढवित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या क्रूड तेल 75 डॉलर ओलांडत आहे. रिफायनरी उत्पादनांमध्ये क्रूड तेलाचा 90% वाटा आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे वाहतुकीची किंमतही वाढते. यामुळे अन्नाची किंमत वाढलीय.

संबंधित बातम्या

PPF खात्याचे 5 मोठे फायदे, छोट्या बचतीवर बंपर रिटर्न मिळण्याची संधी

व्याजातून कमाई करायचीय तर आयकराचा हा नियम वाचा, मिळेल संपूर्ण माहिती

June Retail Inflation: Reassuring news on the forefront of inflation, retail inflation declined in June

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.