Special Story | शाळा सोडून दुकानात कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं काम, आज कंपनीची कमाई 54.8 कोटी, कोण आहेत कैलास काटकर?

success story of quick heal : कैलास जेव्हा 22 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी प्रथम बॅंकेत एक संगणक पाहिला, जिथे ते कॅल्क्युलेटर दुरुस्त करायला जायचे. हे टीव्हीसारखे उपकरण भविष्य आहे हे कैलास यांनी तेव्हाच ओळखले. कैलास त्यांच्या दुरुस्तीच्या कामातून मिळणारा पैसा नवीन मशीनमध्ये गुंतवण्यासाठी पुरेसा होता. कैलास यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी घरात गुंतवणूक करावी, पण कैलास यांनी त्यांच्या कामाला प्राधान्य दिले.

Special Story | शाळा सोडून दुकानात कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं काम, आज कंपनीची कमाई 54.8 कोटी, कोण आहेत कैलास काटकर?
kailas katkar

मुंबईः Story of Quick Heal: संगणक…एक नाव ज्याकडे आधी टीव्हीसारखे एक बॉक्स म्हणून पाहिले जायचे. पण तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत गेले, तसतसे संगणकपासून ते लॅपटॉप, टॅब आणि स्मार्टफोनपर्यंत पसरले. आज संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन बहुतेक लोकांसाठी एक सामान्य तंत्रज्ञान बनलेय. परंतु या तंत्रज्ञानाचा धोकादेखील असतो. कारण त्यात व्हायरस घुसू शकतात. एक व्हायरस आणि संपूर्ण संगणक किंवा स्मार्टफोन निरुपयोगी करू शकतो. या उपकरणांचे व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अँटी व्हायरस सॉफ्टवेअर्सचा शोध लावला गेला. अँटीव्हायरस सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं तर क्विक हीलचं नाव पहिल्यांदा घेता येईल.

Quick Heal आज 54.8 कोटी रुपयांच्या कमाईची कंपनी

भारतातील सायबर सुरक्षा प्रदाता Quick Heal आज 54.8 कोटी रुपयांच्या कमाईची कंपनी आहे. BSE वर Quick Heal Technologies चे बाजारमूल्य 1,341.80 कोटी रुपये आहे. ही कंपनी कैलास काटकर आणि संजय काटकर या दोन भावांनी सुरू केली असली तरी त्याचे खरे जनक हे कैलास काटकर होते. कैलास हे Quickheal चे MD आणि CEO आहेत, तर संजय कंपनीचे CTO आहेत. शाळा सोडलेल्या कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं काम करणाऱ्या कैलास यांना क्विक हीलची कल्पना सुचली आणि ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. त्यांची संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

कैलास यांनी दहावीपर्यंतच शिक्षण घेतले

कैलास यांना जास्त अभ्यासाची आवड नव्हती. मॅट्रिकनंतरच त्यांनी कामाला सुरुवात केली. कैलास यांनी दहावीनंतरच शाळा सोडली, कारण त्यांना वाटले की ते पुढची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत. पण ते उत्तीर्ण झाले. त्यांनी 1985 मध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एका रिपेअरिंग शॉपमधून केली, जिथे ते कॅल्क्युलेटर आणि रेडिओ दुरुस्त करायचे. कॅल्क्युलेटर दुरुस्त करण्यासाठी त्यांना महिन्याला 400 रुपये मिळायचे. कैलास यांचे वडील फिलिप्स येथे मशीन सेटर होते आणि कैलास यांनी आपल्या वडिलांना घरी रेडिओ दुरुस्त करताना पाहिले होते. हळूहळू स्क्रीन प्रिंटिंग, रेडिओ रिपेअरिंग इत्यादींमधून त्यांची कमाई महिन्याला 2000 रुपये झाली.

1991 मध्ये स्वतःचे दुकान उघडले

कॅल्क्युलेटर दुरुस्तीच्या नोकरीमुळे त्यांना तांत्रिक क्षेत्राविषयी ज्ञान मिळण्यास आणि पुरेसे कौशल्य शिकण्यास मदत मिळाली. कैलाश यांचा भाऊ संजय याला बारावीनंतर शिक्षण सोडायचे होते, पण औपचारिक शिक्षण पूर्ण न केल्यामुळे कैलाश यांनी त्याला पुढे शिकण्याचा सल्ला दिला. भावाची संगणक शिक्षण फी 5000 रुपये होती, जी कैलास यांच्या कुटुंबासाठी खूप जास्त होती, म्हणून कैलास यांनी त्याच्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. 1991 मध्ये त्यांनी पुण्यात स्वतःचे कॅल्क्युलेटर दुरुस्तीचे दुकान उघडले. दुकान उघडण्यासाठी त्यांनी 15000 रुपये गुंतवले. नंतर त्यांनी इतर मशिन्सही दुरुस्त करायला सुरुवात केली. लवकरच त्यांना न्यू इंडिया इन्शुरन्ससाठी वार्षिक देखभाल करार मिळाला.

पहिला संगणक 50 हजार रुपयांना विकत घेतला

कैलास जेव्हा 22 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी प्रथम बॅंकेत एक संगणक पाहिला, जिथे ते कॅल्क्युलेटर दुरुस्त करायला जायचे. हे टीव्हीसारखे उपकरण भविष्य आहे हे कैलास यांनी तेव्हाच ओळखले. कैलास त्यांच्या दुरुस्तीच्या कामातून मिळणारा पैसा नवीन मशीनमध्ये गुंतवण्यासाठी पुरेसा होता. कैलास यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी घरात गुंतवणूक करावी, पण कैलास यांनी त्यांच्या कामाला प्राधान्य दिले. त्यांनी पहिला संगणक 50 हजार रुपयांना विकत घेतला, जो त्यांनी बिलिंगसाठी वापरला आणि लोक त्यांच्या दुकानात फक्त ते पाहण्यासाठी येत होते.

सॉफ्टवेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय कधी घेतला?

हा तो काळ होता, जेव्हा सॉफ्टवेअरचा बाजार तेजीत होता. कैलासदेखील त्याच्या प्रभावापासून दूर नव्हते. त्यांनी 1993 मध्ये त्यांचा दुरुस्ती व्यवसाय तसेच CAT संगणक सेवा सुरू केली. ही कंपनी संगणक देखभाल सेवा देत असे. यादरम्यान कैलास यांना आढळून आले की, दुरुस्तीसाठी येणाऱ्या बहुतांश मशीनमध्ये विषाणूची लागण झालीय. हे पाहून कैलास यांनी संजयला अँटी व्हायरस प्रोग्रामवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. संजय त्यांच्या मास्टर्सच्या दिवसात त्याच्या भावाच्या दुकानात वारंवार येत असे. संजयने त्याच्या मास्टर्सच्या दुसर्‍या वर्षात संक्रमित मशीन ठीक करण्यासाठी एक प्रोग्राम विकसित केला. त्यानंतर त्याने असे आणखी 2-4 प्रोग्रॅम विकसित केले, जे कैलाश यांनी त्यांच्या वर्कशॉपमध्ये रिपेअरिंगसाठी येणाऱ्या कॉम्प्युटरमध्ये वापरले.

1995 मध्ये DOS साठी Quickheal Antivirus हे त्यांचे पहिले उत्पादन लाँच

भविष्यात अँटीव्हायरस प्रोग्राम्सच्या तीव्र मागणीचा अंदाज घेऊन काटकर ब्रदर्सने हार्डवेअर दुरुस्तीपासून अँटी व्हायरस सोल्युशन्सवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. काटकर बंधूंनी 1995 मध्ये DOS साठी Quickheal Antivirus हे त्यांचे पहिले उत्पादन लाँच केले. क्विक हील 700 रुपयांना विकला जाऊ लागला, ज्यामुळे तो त्या वेळी उपलब्ध असलेल्या स्वस्त पर्यायांपैकी एक होता. त्यानंतर भाऊंनी मागे वळून पाहिले नाही. 1998 पर्यंत काटकर ब्रदर्सने हार्डवेअर दुरुस्ती थांबवली आणि अँटी व्हायरसकडे वळले. कैलास उत्पादनांचे मार्केटिंग करायचे, तर संजय संशोधन आणि विकासाचे काम पाहत असे.

जेव्हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर पोहोचला होता

क्विक हीलचा व्यवसाय सुरुवातीची पहिली 5 वर्षे पुण्यापुरता मर्यादित होता आणि तो अद्याप यशस्वी झालेला नव्हता. 1999 मध्ये बँका आणि गुंतवणूकदारांकडून व्याज न मिळाल्याने त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला. पण नंतर मित्रांशी बोलून त्यांनी आपल्या उत्पादनाचे आक्रमक मार्केटिंग करण्याचे ठरवले. कैलाश यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात अर्ध्या पानाची जाहिरात केली आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

2003 मध्ये क्विक हीलची पहिली शाखा नाशिकमध्ये उघडण्यात आली

2002 मध्ये त्यांनी पुण्याबाहेर व्यवसाय वाढवला. 2003 मध्ये क्विक हीलची पहिली शाखा नाशिकमध्ये उघडण्यात आली आणि कंपनीच्या सर्व हार्डवेअर विक्रेत्यांना क्विक हील सॉफ्टवेअर विकण्यास सांगण्यात आले. 2002 ते 2010 बीच क्विक हीलने पुण्याबाहेरील इतर मोठ्या शहरांमध्ये विस्तार करण्यास सुरुवात केली. काटकर ब्रदर्सने 2011-12 मध्ये एंटरप्राइज सोल्युशन्स व्यवसायात प्रवेश केला. मग हळूहळू कंपनी एक जागतिक ब्रँड म्हणून नावारुपाला आली.

2007 मध्ये कंपनीचे नाव बदलले

2007 मध्ये पुण्यात नवीन संशोधन आणि विकास केंद्र उघडल्यानंतर कंपनीचे नाव बदलून Quickheal Technologies Limited असे करण्यात आले. 2010 मध्ये कंपनीला Sequoia Capital कडून 60 कोटी रुपयांचा निधी मिळाला. हा निधी नवीन शाखा उघडण्यासाठी वापरण्यात आला. तामिळनाडूनंतर दोन वर्षांत जपान, अमेरिका, आफ्रिका आणि यूएईमध्ये शाखा उघडण्यात आल्या. 2011 मध्ये क्विक हीलने एंटरप्राइझ ग्राहकांसाठी सुरक्षा सॉफ्टवेअर विकसित करण्यास सुरुवात केली आणि 2013 पर्यंत कंपनीने संगणक आणि सर्व्हरसाठी पहिले एंटरप्राइझ अँडपॉइंट सुरक्षा सॉफ्टवेअर जारी केले. आज कंपनी रिटेल आणि एंटरप्राइझ या दोन्ही विभागांना उत्पादने पुरवते. क्विक हीलचा आयपीओ 2016 साली आला आणि त्यानंतर तो शेअर बाजारात लिस्ट झाला.

संबंधित बातम्या

D-Mart मध्ये स्वस्तात किराणा विकणारा श्रीमंत मालक, कोण आहेत राधाकृष्ण दमानी?

Success Story: अवघ्या 99 रुपयांत पँट विकणाऱ्या किशोर बियाणींनी 9000 कोटीचे पँटालून कसे बनवले? वाचा सविस्तर

Published On - 11:31 pm, Tue, 9 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI