AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC ची खास योजना, प्रत्येक महिन्याला मिळतील 16000; आताच करा गुंतवणूक

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90 दिवस ते 55 वर्षे वयोगटातील लोकांसाठी ही एक एन्डॉयमेंटसह जीवन विमा योजना आहे.

LIC ची खास योजना, प्रत्येक महिन्याला मिळतील 16000; आताच करा गुंतवणूक
| Edited By: | Updated on: Feb 20, 2021 | 8:58 AM
Share

मुंबई : देशातली सगळ्यात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच खास योजना आणत असते. आताही LIC ने अशीच खास योजना ग्राहकांनसाठी आणली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90 दिवस ते 55 वर्षे वयोगटातील लोकांसाठी ही एक एन्डॉयमेंटसह जीवन विमा योजना आहे. (lic policy jeevan umang pay all installment and get benefit till 99 years)

एलआयसीची ही योजना वयाच्या 100 वर्षांपर्यंत कव्हर करते. या पॉलिसीच्या मॅच्युअरिटीची रक्कम 100 वर्षे पूर्ण झाल्यावर मिळेल. जर पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याने भरलेला सर्व प्रीमियम नामित व्यक्तीला परत केला जाईल. LIC जीवन उमंग योजना असं या खास योजनेचं नाव आहे. यामध्ये प्रीमियम पेमेंट कालावधीनंतर विमाराशीच्या 8 टक्के रक्कम आयुष्यासाठी किंवा 100 वर्षे वयापर्यंत दिली जाते.

जर एखाद्या व्यक्तीने वयाची 100 वर्षे पूर्ण केली तर कंपनी एकरकमी रक्कम विमाधारकास देईल. इतकंच नाहीतर वयाच्या 100 व्या वर्षी पॉलिसीधारकास सम अ‍ॅश्युअर्ड, सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम एडिसन बोनस दिला जाईल.

इनकम टॅक्सवरही मिळते सूट

या योजनेला आजीवन योजनासुद्धा म्हणतात. या योजनेसाठी एलआयसीने ग्राहकांना चार पर्याय दिले आहेत. यामध्ये तुम्ही 15, 20, 25 आणि 30 वयापर्यंत लोक याचा फायदा घेऊ शकतात. तुम्हालाही जर यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर यासाठी किमान दोन लाख रुपयांचा विमा घ्यावा लागेल. या योजनेचं सगळ्याक खास वैशिष्ट्य म्हणजे 80 सी अंतर्गत तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर आयकरामध्येही सूट मिळणार आहे.

99 वर्षांसाठी दरमहा मिळतील पैसे

समजा तुम्ही 25 वर्षांचे असाल आणि 25 वर्षांच्या कालावधीसाठी दोन लाखांचा विमा घेतला तर तुम्हाला 25 वर्षे प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच वर्षाकाठी 8400 रुपये. 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला दरवर्षी एकूण ठेवींपैकी आठ टक्के रक्कम मिळणे सुरू होईल. ही रक्कम 16000 हजार रुपये असेल. तुम्हाला हे 99 वर्षे मिळणार आहे आणि 100 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला 21 लाख रुपये दिले जातील. (lic policy jeevan umang pay all installment and get benefit till 99 years)

संबंधित बातम्या – 

RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या ग्राहकांना आता काढता येणार फक्त 1 हजार

Petrol Diesel Price: मुंबईत 97 रुपये झालं पेट्रोल, डिझेलच्या किंमतीही वाढल्या; वाचा आजचे दर

कर्ज घेण्यासाठी धमाकेदार ऑफर, सगळ्यात कमी व्याज दरावर मिळणार 50 लाखांपर्यंत लोन

एक रुपयाही खर्च न करता घर बसल्या कमवा पैसे, या 8 सोप्या पद्धती तुम्हीही वापरा

(lic policy jeevan umang pay all installment and get benefit till 99 years)

Follow Us
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?