AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price: मुंबईत 97 रुपये झालं पेट्रोल, डिझेलच्या किंमतीही वाढल्या; वाचा आजचे दर

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today) सातत्याने वाढ होत आहे. ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वावही वाढत आहे. आजही देशातल्या अनेक भागांमध्ये शंभरच्या पार इंधन पोहोचलं आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरात 34 ते 39 पैशांपेक्षा वाढलं आहे. (petrol diesel hike today 20 February petrol price of mumbai delhi […]

Petrol Diesel Price: मुंबईत 97 रुपये झालं पेट्रोल, डिझेलच्या किंमतीही वाढल्या; वाचा आजचे दर
| Edited By: | Updated on: Feb 20, 2021 | 6:53 AM
Share

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today) सातत्याने वाढ होत आहे. ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वावही वाढत आहे. आजही देशातल्या अनेक भागांमध्ये शंभरच्या पार इंधन पोहोचलं आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरात 34 ते 39 पैशांपेक्षा वाढलं आहे. (petrol diesel hike today 20 February petrol price of mumbai delhi noida)

खरंतर, तेल कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार आज सलग 11 व्या दिवशी ही वाढ झाली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. दिल्लीत 39 पैसे वाढीसह 90.58 वर पोचलं तर मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.00 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच मेट्रो शहरांमध्ये इंधनाच्या किंमती वाढल्याचं पाहायला मिळालं आहे.

दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दरांनी कहर केला आहे. शुक्रवारी दिल्लीतल्या अनेक शहरांमध्ये 30 ते 35 पैशांनी इंधनामध्ये वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, गुरुवारी कोलकातामध्ये पेट्रोल 91.78 लिटर भाव आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर आज दिल्लीत डिझेल 80.97 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात असून मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 88.06 तर कोलकातामध्ये डिझेलचा दर प्रति लिटर 84.56 रुपये आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.58 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 97.00 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 91.78 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 92.59 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Petrol Price Today): 88.92 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.97 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.06 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.56 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 85.98 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Diesel Price Today): 81.41 रुपये प्रति लिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel hike today 20 February petrol price of mumbai delhi noida)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Price Today : शंभरी गाठूनही पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे दर

परभणीत देशातील सर्वात महाग इंधन, पेट्रोल 98 रुपयांच्या पार, वाहनचालक त्रस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनं शंभरी गाठली, पुण्यात काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात आंदोलन

(petrol diesel hike today 20 February petrol price of mumbai delhi noida)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.