कर्ज घेण्यासाठी धमाकेदार ऑफर, सगळ्यात कमी व्याज दरावर मिळणार 50 लाखांपर्यंत लोन

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Feb 19, 2021 | 2:42 PM

तुम्हाला पर्सनल लोन (Personal Loan) हवा असेल तर स्टेट बॅक ऑफ इंडिया तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे.

कर्ज घेण्यासाठी धमाकेदार ऑफर, सगळ्यात कमी व्याज दरावर मिळणार 50 लाखांपर्यंत लोन

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक धोरण ढासळलं असताना आता व्यवसायासाठी अनेकांवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. अशात तुम्हीही जर तुमच्या बिझनेससाठी कर्ज घेण्याच्या तयारीत (Loan is required) असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्हाला पर्सनल लोन (Personal Loan) हवा असेल तर स्टेट बॅक ऑफ इंडिया तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये तुम्ही SBI Gold Loan चा लाभ घेऊ शकता. SBI Gold loan मध्ये तुम्हाला फक्त 7.5 टक्क व्याज दर असणार आहे. इकतंच नाहीतर या सगळ्यासाठी तुमच्याकडून कुठलाही शुल्क आकारला जाणार नाही. (loan interest rate sbi gold loan available with zero processing fees and less interest rates)

SBI Gold Loan सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सोनं गहान ठेवावं लागेल. याचा फायदा असा की यामध्ये व्याजदर कमी आहे. यामध्ये तुम्ही कमीत कमी 20 हजार आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपये कर्ज घेऊ शकता. खरतरं, गोल्ड लोनमध्ये एसबीआय 0.25 टक्के शुल्क आकरते. पण सध्याच्या ऑफर अंतर्गत प्रोसेसिंग फी शुन्य आहे. YONO SBI App च्या मदतीनेही तुम्ही कर्ज घेऊ शकता.

एका फोनवर मिळेल कर्ज

या सुविधेतून तुम्हालाही कर्ज घ्यायचं असेल तर यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवरून 7208933143 या कस्टमर केअरच्या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. तुम्ही एसएमएसकरूनही कर्जाच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यासाठी 7208933145 वर “GOLD” असा मेसेज करा. या सुविधेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

दरम्यान, यामध्ये तुम्ही गोल्ड लोनव्यतिरिक्त पर्सनल लोनही घेऊ शकता. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार ग्राहक त्यांच्या टोल फ्री क्रमांकावर 1800-11-221 वर कॉल करून वैयक्तिक कर्जाशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, जर आपल्याला SMS द्वारे कर्ज हवे असेल तर आपण SMS मध्ये PERSONAL लिहून 7208933145 वर एसएमएस पाठवू शकता. एसएमएस पाठवताच तुम्हाला बँकेचा कॉल येईल आणि तुमच्या कर्जाची पुढील प्रक्रिया सुरू होईल.

आपण या सेवा देखील घेऊ शकता

मिस्ड कॉलच्या सेवेद्वारे आपण केवळ वैयक्तिक कर्जच घेऊ शकत नाही, तर शिल्लक रक्कम तपासण्यासाठी, मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी आणि इतर महत्त्वपूर्ण कामांची माहिती मिळवू शकता. कर्ज बाजारात वाढती स्पर्धा पाहता ही सुविधा देशातील बऱ्याच मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांविषयी बोलताना पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा यांसारख्या बँकासुद्धा ही सुविधा पुरवतात. त्याचबरोबर खासगी बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांच्यासह अनेक बँका मिस कॉलची सुविधा देतात. (loan interest rate sbi gold loan available with zero processing fees and less interest rates)

संबंधित बातम्या – 

स्टॅम्प पेपरच्या व्यवसायात बक्कळ पैसा कमावण्याची संधी, कमी पैशांमध्ये मिळेल जास्त नफा

तुमच्या बचत खात्यावर मिळवा एफडीपेक्षा जास्त व्याज, आजच बँकेत जाऊन करा ‘हे’ काम

महिन्याला 10 हजार रुपये कमवण्याची संधी, SBI च्या धमाकेदार योजनेमध्ये करा गुंतवणूक

Good News! आता एकच अकाऊंट 25 जणांमध्ये वापरा, Idea आणि Vodafone ची धमाकेदार ऑफर

(loan interest rate sbi gold loan available with zero processing fees and less interest rates)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI