AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या ग्राहकांना आता काढता येणार फक्त 1 हजार

पुढील सहा महिन्यांसाठी ही सूचना देण्यात आली आहे. तर सहकारी बँकेला कोणतीही पूर्वसूचनाशिवाय नवीन गुंतवणूक किंवा नवीन देनेदारी घेण्यावर बंदी घातली आहे.

RBI चा मोठा निर्णय, 'या' बँकेच्या ग्राहकांना आता काढता येणार फक्त 1 हजार
| Edited By: | Updated on: Feb 20, 2021 | 7:48 AM
Share

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्नाटकच्या डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत (Deccan Urban Co-op Bank) एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने डेक्कन अर्बन बँकेला नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवी स्वीकारण्यावर बंदी घातली आहे. इतकंच नाहीतर ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातून एक हजाराहून अधिक पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही सूचना देण्यात आली आहे. तर सहकारी बँकेला कोणतीही पूर्वसूचनाशिवाय नवीन गुंतवणूक किंवा नवीन देनेदारी घेण्यावर बंदी घातली आहे. (rbi puts rs 1000 withdrawal cap on deccan urban co op bank here is all details)

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासंबंधी सूचना दिल्या असल्याचं आरबीआयने म्हटले आहे. यासंबंधी केंद्रीय बँकेने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, ‘बँकेची सध्याची स्थिती लक्षात घेता ठेवीदारांना सर्व बचत खाती किंवा चालू खात्यांमधून एक हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी मिळणार नाही.’

सहा महिन्यांसाठी निर्देश

खरंतर, नियामकाने दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण 99.58 टक्के ठेवीदार ठेवी विमा आणि कर्ज हमी कॉर्पोरेशन विमा कॉर्पोरेशन (डीसीजीसी) योजनेंतर्गत आहेत. डीसीजीसी ही आरबीआयची एक सपोर्टिव्ह कंपनी आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, बँकेवरील बंदीचा अर्थ बँक परवाना रद्द केला असा नाही. आता जारी केलेल्या निर्देशानुसार, आर्थिक परिस्थिती बँकेची सुधारण्यासाठी बँक मदत होईल आणि व्यवहार सुरू राहतील. 19 फेब्रुवारी 2021 ला हा नियम जारी करण्यात आला असून सहा महिने लागू राहिल.

देशामध्ये शेती आणि ग्रामीण भागात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी संस्था कायद्यांतर्गत सहकारी बँका स्थापन केल्या आहेत. गेल्या वर्षी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर सर्व सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आल्या. (rbi puts rs 1000 withdrawal cap on deccan urban co op bank here is all details)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Price: मुंबईत 97 रुपये झालं पेट्रोल, डिझेलच्या किंमतीही वाढल्या; वाचा आजचे दर

कर्ज घेण्यासाठी धमाकेदार ऑफर, सगळ्यात कमी व्याज दरावर मिळणार 50 लाखांपर्यंत लोन

एक रुपयाही खर्च न करता घर बसल्या कमवा पैसे, या 8 सोप्या पद्धती तुम्हीही वापरा

(rbi puts rs 1000 withdrawal cap on deccan urban co op bank here is all details)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.