AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer: सोने-चांदीत गुंतवणूक करायचीय, दागिने- नाण्यांच्या ऐवजी ETF बेस्ट पर्याय?, तज्ज्ञांचे मत काय

आजच्या काळात सोने-चांदी गुंतवणूकीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही मग सोने-चांदीचे दागिने, नाणी, ब्रिक्स,बार, बिस्कीटात गुंतवणूक करु शकता. वा 'डिजिटल गोल्ड' वा गोल्ड-सिल्व्हर ईटीएफमध्ये पैसे लावू शकता.

Explainer: सोने-चांदीत गुंतवणूक करायचीय, दागिने- नाण्यांच्या ऐवजी ETF बेस्ट पर्याय?, तज्ज्ञांचे मत काय
investment in Gold and Silver
| Updated on: Dec 29, 2025 | 4:38 PM
Share

सोने आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याने यात गुंतवणूकीचा ओघ देखील वाढला आहे. सोने आणि चांदीत गुंतवणूक वाढल्याने आता तज्ज्ञांनी गुंतवणूकीच्या विविध पर्यायात आता गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) हा एक चांगला पर्याय असल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफला कमी पैशातही खरेदी करता येते. ईटीएफच्या देखभालीची काही झंझट नसते. आणि खूप कमी लेन-देन शुल्कासह सहज विक्रीची सुविधा देखील मिळते. तज्ज्ञांनी सांगितले की जर तुम्ही फिजिकल गोल्ड – सिल्व्हरमध्ये गुंतवणूक करु इच्छीत असाल तर मात्र दागिन्यांपेक्षा नाणी आणि बिस्कीट्स किंवा ब्रिक चांगला पर्याय आहे.

दागिन्यांच्या घडणावळीत खर्च होतो पैसा

दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जच्या रुपात एक मोठी रक्कम देखील खर्च करावी लागते. त्यामुळे दागिन्यांची किंमत खूपच जास्त होते. मात्र हेच दागिने विकताना तुम्हाला मेकिंग चार्जचा एक रुपयाही मिळत नाही.त्यामुळे सोन्याचे दागिने गुंतवणूकीचा चांगला पर्याय नाही. सोन्याच्या किंमतीत आता 82 टक्के आणि चांदीच्या किंमतीत 175 टक्के वाढ झालेली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX)वर 1 जानेवारी रोजी सोने 76,772 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. जे 26 डिसेंबर रोजी 1,39,890 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तसेच 1 जानेवारी चांदीचा भाव 87,300 रुपये प्रति किलो होता, जो 26 डिसेंबर रोजी वाढून 2,40,300 रुपये प्रति किलोवर पोहचला.

गुंतवणूकीच्या लक्ष्यांआधारित खरेदी व्हावी

मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूकीसाठी उपलब्ध विविध पर्यायात गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफ चांगला पर्याय असल्याचे गुंतवणूकीच्या पर्यायांसंदर्भात माहिती देताना मेहता इक्विटीजचे वाईस प्रेसिडंट ( कमोडिटी ) राहुल कलंत्री यांनी सांगितले. ते म्हणाले की जेव्हा सोने वा चांदीच्या गुंतवणूकीचा प्रश्न येतो तेव्हा याने फरक पडत नाही की तुम्ही यास कोणत्या रुपात ठेवता. हे मूळ रुपाने तुमच्या ज्ञान आणि खरेदीच्या सर्वात सुविधाजनक साधनांवर अवलंबून असते. अंतत:, प्रत्येक व्यक्तीची पसंत त्याचे व्यक्तीगत लक्ष्य, उपयोगाची आवश्यकता आणि गुंतवणूकीत घालवण्याच्या काळाच्या आधारावर वेगवेगळी असते.

ईटीएफ आतापर्यंतचा सर्वात चांगला गुंतवणूक पर्याय

उपलब्ध गुंतवणूक पर्यायांमधून गोल्ड / सिल्व्हर ईटीएफ आतापर्यंतचा सर्वात चांगला गुंतवणूक पर्याय आहे. याचे कारण गुंतवणूकीसाठी उपलब्ध कमी मुल्याच्या युनिट्समुळे देखभालीचा कोणताही खर्च येत नाही, शेवटी ईटीएफच्या माध्यमातून शुद्धतेची गॅरंटी, उच्च तरलता आणि कमी लेनदेन भांडवल सारखे लाभ आहेत, असे शेअर एण्ड स्टॉक ब्रोकर्सचे संचालक (कमोडिटी आणि करन्सी) नवीन माथुर यांनी म्हटले आहे. गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफ गुंतवणूक फंड ज्यांचे शेअर बाजारात शेअर सारखाच कारभार होत असतो. यात फिजिकली गोल्ड – सिल्व्हर खरेदी केल्याशिवाय या धातूत गुंतवणूक केली जाऊ शकते असेही नवीन माथुर यांनी म्हटले आहे.

म्यूच्युअल फंडद्वारे देखील गोल्ड-सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक होते

गोल्ड-सिल्वर ईटीएफमध्ये म्यूच्युअल फंडाद्वारे देखील गुंतवणूक करता येते. सोन्यात गुंतवणूक भौतिक रुपाने मुल्यवान धातू खरेदी करुन, ईटीएफ, वायदा तसेच पर्याय वा नंतर म्युच्युअल फंडाद्वारे करता येते. एक्सपर्ट्सनुसार प्रत्येक पर्यायाचे त्याचे फायदे आणि नुकसान आहेत. यासाठी गुंतवणूकदारांसाठी हे समजणे महत्वपूर्ण आहे की त्याच्या लक्ष्यासाठी कोणता पर्याय जास्त चांगला आहे. भौतिक रुपाने प्रत्यक्ष मौल्यवान धातू खरेदी करण्याच्या फायदे आणि नुकसाना संदर्भात विचारले असता राहुल कलंत्री यांनी सांगितले की जर तुम्ही फिजिकल गोल्ड – सिल्व्हर खरेदीला महत्व देत असला तर तुमच्यासाठी नाण्यांच्या रुपात वा बिस्कीटांच्या रुपात धातू खरेदी करणे चांगले आहे.

ईटीएफच्या तुलनेत फिजिकल गोल्ड विकणे कठीण

फिजिकल गोल्ड-सिल्वर प्रत्यक्ष मालकी प्रदान करतात आणि मुल्याच्या एका मजबूत भांडाराच्या रुपात काम करतात. परंतू याची देखभाल, विम्याचा खर्च आणि कमी तरलता म्हणजे वसुल करण्याच्या समस्येचा समावेश होतो. वायदा तसेच विकल्प कारभाराद्वारे गुंतवणूकीच्या संदर्भात कलंत्री यांनी सांगितले की हे त्या अनुभवी गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहे जे अल्पकालिक संधीच्या शोधात आहेत. वा जोखीम कमी करण्यासाठी ‘हेजिंग’ करु इच्छीत आहेत. परंतू हे जास्त रिस्की असते. डिजिटल गोल्ड संदर्भात त्यांनी सांगितले की डिजिटल गोल्ड मुख्य रुपाने सुविधाजनक असणे, कमी गुंतवणूक रक्कम, खरेदी करणे आणि विक्रीत सोपे असल्याने लोकप्रिय होत आहे.

डिजिटल गोल्डला थर्ड-पार्टी वॉल्ट मॅनेजर मॅनेज करतात

मात्र डिजिटल गोल्ड हे सेबीद्वारे नियंत्रित उत्पादन नाही. हे सर्वसाधारणपणे प्रायव्हेट प्लॅटफॉर्मद्वारा सादर केले जाते. जेथे सोने थर्ड-पार्टी वॉल्ट मॅनेजरांकडे ठेवलेले असते. ज्यात रिस्क जोडलेली असते. नियामकीय जोखीम पाहाताना आम्ही गुंतवणूकदारांना सल्ला देतो की केवळ सेबीद्वारे नियंत्रित उत्पादनांद्वारे सोने वा चांदीत गुंतवणूक करा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सोने-चांदीचे दर सलग पाचव्या दिवशी चढेच –

सोने आणि चांदीचे दर आज म्हणजे 29 डिसेंबर रोजी लागोपाठ पाचव्या दिवशी कामकाजाच्या दिवसभपरात ऑलटाईम हायवर होते. इंडिया बुलियन एण्ड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या मते 10 ग्रॅम सोन्याची किंमत 205 रुपये वाढून  1,38,161 वर पोहचली. याआधी ती 1,37,956 रुपये प्रति 10 ग्रॅम होती.

तर चांदी 1,53,76 रुपये महाग होऊन 2,43,483 किलो झाली आहे. याआधी चांदीचा दर  2,28,107 रुपये होतो. या वर्षी सोने 61,999 रुपयांनी तर चांदी  1,57,466 रुपयांनी महाग झालेली आहे.

यावर्षी सोने ₹61,999 आणि चांदी ₹1,57,466 महाग झाली

भाजपाने आतापर्यंत सोन्याची किंमत 61,999 रुपये वाढलेली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 76,162 रुपये होता. जो आता  1,38,161 रुपये झाला आहे. चांदीचा भाव या दरम्यान 1,57,466 रुपये वाढला आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी एक किलो चांदीची किंमत 86,017 रुपये होती जी आता 2,43,483 रुपये प्रति किलो झाली आहे.

दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर.
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.