Gold Silver Price Today : शंबर नंबरी सोनं! खरेदीदारांचं नशीब पालटलं, दोन हजारांनी झालं स्वस्त

Gold Silver Price Today : सध्या गुंतवणूकदारांना सोने आणि चांदीने आकर्षित केले आहे. यातील गुंतवणूक फायदेशीर असेल अनेकांना वाटते. गेल्या काही महिन्यात सोने 50,000 रुपयांवरुन 59,000 रुपयांच्या आसपास पोहचले होते. तर चांदीनेही लांब उडी मारली होती. पण सोन्याने एका महिन्यात रिव्हर्स गिअर टाकला आणि हा भाव तीन हजारांच्या आसपास घसरला आहे.

Gold Silver Price Today : शंबर नंबरी सोनं! खरेदीदारांचं नशीब पालटलं, दोन हजारांनी झालं स्वस्त
झाली की हो चंगळ
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 9:29 AM

नवी दिल्ली : देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. भारतीय मुळातच उत्सवप्रेमी असल्याने आनंद साजरा करण्यात ते कुठलीच कसर ठेवत नाही. मागील काही महिन्यांपेक्षा सध्या सोन्या-चांदीचा भाव (Gold Silver Price) जास्त असला तरी यापूर्वी या किंमती धातूंनी गाठलेल्या उच्चांकापेक्षा हा भाव नरमला आहे. सध्या गुंतवणूकदारांना सोने आणि चांदीने आकर्षित केले आहे. यातील गुंतवणूक (Investment) फायदेशीर असेल अनेकांना वाटते. गेल्या काही महिन्यात सोने 50,000 रुपयांवरुन 59,000 रुपयांच्या आसपास पोहचले होते. तर चांदीनेही लांब उडी मारली होती. पण सोन्याने एका महिन्यात रिव्हर्स गिअर टाकला आणि हा भाव तीन हजारांच्या आसपास घसरला आहे. या आठवड्यातील भावात चढउतार दिसून आला. पण सध्या खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आहे, हे नक्की.

सध्या सोन्याचा भाव 56000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 64000 रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवडाभरात दोन्ही किंमतीत धातूत चढउतार दिसून आला. प्रत्येक दिवशी सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून येत होता. काही दिवस सोन्याच्या भाव वधारले तर काही दिवस भावात नरमाई दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार 22 कॅरेट सोन्यात 50 रुपयांनी वाढ होऊन भाव 51,950 रुपये, तर 24 कॅरेट सोन्यात घसरण 50 रुपयांची होऊन किंमत 56,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) आठवड्यातील पाच दिवस सोन्या-चांदीचे भाव जाहीर करते. त्यातही सर्व कॅरेटचे भाव जाहीर करण्यात येतात. त्यानुसार भावात तब्बल 30,000 रुपयांपर्यंत तफावत दिसते. शुद्ध सोन्याचा भाव सर्वाधिक आहे. मिश्रीत सोन्याचा वापर कमी होत असला तरी त्याचा भाव 30-32 हजारांच्या घरात आहे. शनिवार-रविवारी आयबीजेए कुठलाही दर जाहीर करत नाही. सोमवारी आता नवीन दर जाहीर करण्यात येतील.

हे सुद्धा वाचा

या आठवड्यात सोन्याची चाल

  1. या शुक्रवारी सोन्याचा भाव 16 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. सोने 56103 रुपये झाले
  2. गुरुवारी सोने 53 रुपये प्रति 10 स्वस्त होते. हा भाव 56,087 रुपये होता
  3. या आठवड्यात बुधवारी सोने 590 रुपये प्रति 10 महागले होते. हा भाव 56140 रुपये होता
  4. मंगळवारी सोने 116 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले. सोन्याची किंमत 55550 रुपये होती
  5. पहिल्या दिवशी सोमवारी सोने 291 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन भाव 55666 रुपये होता

या आठवड्यात चांदीची चमक

  1. या शुक्रवारी चांदीच्या किंमतीत तेजी होती. 433 रुपयांनी चांदी महागली. भाव 64,139 रुपये प्रति किलोवर बंद झाले
  2. गुरुवारी चांदीत 540 रुपयांची घसरण झाली. भाव 63,706 रुपये प्रति किलोवर पोहचले
  3. बुधवारी चांदीने उसळी घेतली. भाव 1239 रुपयांनी वधारुन 64,246 रुपये प्रति किलो झाले
  4. मंगळवारी चांदी 439 रुपयांनी नरमली. भाव 63007 रुपये प्रति किलो झाले
  5. पहिल्या दिवशी सोमवारी चांदीत 885 रुपयांची घसरण होऊन किंमत 63,4466 रुपये प्रति किलो झाले

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.