AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder Price: 200 रुपयांनी स्वस्त, आता कितीला मिळेल गॅस सिलेंडर? जाणून घ्या किंमत

LPG Cylinder Price Cut: देशातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. तेल विपणन कंपन्यांनी 1 ऑगस्ट रोजी गॅसच्या किंमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली. ताज्या रेट्सनुसार, ग्राहकांना सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. काय आहे नवीन किंमत? जाणून घ्या.

LPG Cylinder Price: 200 रुपयांनी स्वस्त, आता कितीला मिळेल गॅस सिलेंडर? जाणून घ्या किंमत
गॅस सिलेंडरची किंमत
| Updated on: Aug 01, 2026 | 10:49 AM
Share

महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता धडकली. आज तेल कंपन्यांनी व्यावसायिकांना, हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना मोठा दिलासा दिला. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांची कपात केली आहे. या नवीन किंमतींमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे, कॅटरिंग व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर होतो. तर दुसरीकडे घरगुती 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आता किती घसरली किंमत?

नवीन किंमतीनुसार, दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 202 रुपये, कोलकत्तामध्ये 209 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या दर कपातीचा मोठा दिलासा व्यावसायिकांना मिळणार आहे. तर मुंबईसह चेन्नई शहरात 200 रुपयांच्या जवळपास दिलासा मिळाला आहे. सलग दुसऱ्यांदा व्यावसायिकांना सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. इराण-अमेरिका युद्धा दरम्यान व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने आणि पुरवठ्यातील अनियमिततेमुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. अनेक ढाबे, रेस्टॉरंट बंद करावे लागले होते. तर काहींनी चुलीची व्यवस्था केली होती.

ताज्या दरानुसार, आता दिल्लीत 19 किलो वजनी सिलेंडरची किंमत 2728 रुपये तर कोलकत्तामध्ये हा दर 2872.50 रुपये इतका झाला आहे. दिल्ली शहरात दोन महिन्यात एलपीजीची किंमत 385.50 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मुंबईत सिलेंडरची किंमत आता 2691 रुपये, पटणा शहरात 3018 रुपयांना मिळणार आहे. जुलै महिन्यात तेल कंपन्यांनी 19 किलो वजन सिलेंडरच्या किंमतीत 183 रुपयांची कपात करण्यात आली होती. सलग दुसऱ्या महिन्यात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

घरगुती गॅस ग्राहकांना नाही दिलासा

यावेळी 19 किलो वजनी व्यावसायिक LPG सिलेंडरचा भाव घसरला आहे. 14.2 किलो वजनाच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. या किंमती पूर्वीप्रमाणेच लागू आहेत. ग्राहकांना गॅस स्वस्त होण्याची आशा होती.

या लोकांना झाला फायदा

व्यावसायिक सिलेंडरचा वापर हा हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे, कॅटरिंग सर्व्हिस, ढाबाचालक, चहा टपरी चालक करतात. त्यांना भाव घसरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यात त्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते. गॅसचा अनियमित पुरवठा आणि वाढलेल्या किंमतींनी अनेक व्यावसायिक हैराण झाले होते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या दर कपातीने त्यांना दिलासा मिळाला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी