AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर, सेन्सेक्सने प्रथमच 61000 केला पार, निफ्टी 18300 च्या वर बंद

गुरुवारी विप्रो लिमिटेडचे बाजारमूल्य 4 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. याचे कारण असे आहे की, सप्टेंबर तिमाहीत आयटी कंपनीची कमाई अपेक्षेपेक्षा चांगली होती आणि त्याच्या शेअर्सने उसळी घेतली. काही दलालांनी कमाईनंतर कंपनीच्या समभागासाठी त्यांची लक्ष्य किंमत वाढवली.

बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर, सेन्सेक्सने प्रथमच 61000 केला पार, निफ्टी 18300 च्या वर बंद
शेअर मार्केट
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Oct 14, 2021 | 4:47 PM
Share

नवी दिल्लीः देशांतर्गत शेअर बाजार सलग सहाव्या दिवशी वाढीसह बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी 50 विक्रमी उच्चांकावर बंद झाले. गुरुवारी सेन्सेक्सने प्रथमच 61000 ओलांडले आणि ऑटो वगळता सर्व क्षेत्रांमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे निफ्टीदेखील प्रथमच 18300 च्या वर बंद झाला. हेवीवेट एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी शेअर्स बीएसई सेन्सेक्समध्ये 568.90 अंकांनी वाढून नवीन विक्रम 61,305.95 वर पोहोचले आणि एनएसई निफ्टी 176.80 अंकांच्या वाढीसह 18,338.55 अंकांवर बंद झाला.

स्मॉलकॅप समभागांमध्येही जोरदार खरेदी

हेवीवेट समभागांसह मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही जोरदार खरेदी दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.54 टक्क्यांनी वाढला, तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.46 टक्क्यांनी वधारला.

विप्रोने 4 लाख कोटींचे बाजारमूल्य जमवले

गुरुवारी विप्रो लिमिटेडचे बाजारमूल्य 4 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. याचे कारण असे आहे की, सप्टेंबर तिमाहीत आयटी कंपनीची कमाई अपेक्षेपेक्षा चांगली होती आणि त्याच्या शेअर्सने उसळी घेतली. काही दलालांनी कमाईनंतर कंपनीच्या समभागासाठी त्यांची लक्ष्य किंमत वाढवली. बाजार भांडवलामध्ये 4 ट्रिलियन रुपयांचा टप्पा गाठणारी ती तिसरी आयटी कंपनी आणि 13 वी सूचीबद्ध भारतीय कंपनी आहे.

गुंतवणूकदारांची संपत्ती 2 लाख कोटींनी वाढली

बाजारात मोठ्या तेजीसह गुंतवणूकदारांनी बंपर नफा कमावला. त्यांच्या संपत्तीत 2 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली. बुधवारी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 2,70,73,296.03 कोटी रुपये होते. गुरुवारी ते 2,03,408.83 कोटी रुपयांनी वाढून 2,72,76,704.86 कोटी रुपये झाले. त्याचबरोबर बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्याच्या एका आठवड्यात 10 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली.

संबंधित बातम्या

LIC म्युच्युअल फंडाकडून बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड सुरू, 20 ऑक्टोबरपासून करा गुंतवणूक

घर बसल्या पीएफ काढण्यासाठी अर्ज कसा करावा?, जाणून घ्या प्रोसेस

Market hits new record high, Sensex crosses 61000 for first time, Nifty closes above 18300

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!