मारुती सुझुकीच्या ‘या’ तीन लोकप्रिय गाड्यांचं उत्पादन थांबणार ?

मुंबई : मारुती सुझुकी लोकप्रिय मॉडेल बलेनो, स्वीफ्ट आणि डिझायर व्हेरिअंट बंद करत असल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे. वृत्तानुसार, भारतात BS6 नियम लागू झाल्यानंतर मारुती या गाड्यांचे उत्पादन बंद करण्याच्या विचारात आहे. कंपनीच्या या निर्णयामागील कारण पेट्रेल आणि डिझेलच्या किंमतींमधील अंतर आहे. BS6  नियम लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमधील अंतर हे अडीच […]

मारुती सुझुकीच्या ‘या’ तीन लोकप्रिय गाड्यांचं उत्पादन थांबणार ?
Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : मारुती सुझुकी लोकप्रिय मॉडेल बलेनो, स्वीफ्ट आणि डिझायर व्हेरिअंट बंद करत असल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे. वृत्तानुसार, भारतात BS6 नियम लागू झाल्यानंतर मारुती या गाड्यांचे उत्पादन बंद करण्याच्या विचारात आहे. कंपनीच्या या निर्णयामागील कारण पेट्रेल आणि डिझेलच्या किंमतींमधील अंतर आहे. BS6  नियम लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमधील अंतर हे अडीच लाखापर्यंत जाईल. सध्या हे अंतर एक लाख आहे.

वृत्तानुसार, BS6 नियमांतर्गत पेट्रोल आणि डिझेल कारच्या किंमतीत फार अंतर येईल. हे अंतर अडीच लाखापर्यंत जाऊ शकतं. BS6 नियम लागू झाल्यानंतर डिझेल इंजिनला जास्त अपडेट करावे लागेल. या अपडेशनवर दीड लाखापर्यंत खर्च येईल. यामुळे पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या व्हर्जनमधील अंतर हे एक लाखाहून अडीच लाखावर जाईल.

जर तुमची गाडी रोज 70 किलोमीटर चालत असेल तर 4-5 वर्षात डिझेल व्हर्जनसाठी 1 लाख रुपये खर्च करणे वसूल होते, पण जर यासाठी 2-2.50 लाख देणे महागडं आहे. 10 वर्ष कार चालवल्यानंतरही ही किंमत वसूल होणार नाही. म्हणून मारुती कंपनी डिझेल कारमधील गुंतणूक करण्याच्या विचारात आहे, असे कंपनीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी सांगितले.

मात्र मारुती कंपनीकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. तरी डिझेल व्हर्जनची विक्री कमी झाल्यास कंपनी याचे उत्पादन थांबवण्याची शक्यता आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें