ती आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम; फेल झाला असतो तर… देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा ऐकला का तो किस्सा?
Mukesh Ambani Big Risk : तुम्ही रिस्क घ्यायला, जोखीम घ्यायला घाबरता? भविष्यात काय होईल याचा अति विचार करता का? पण व्यवसायात रिस्क घेतल्याशिवाय काहीच होत नाही हे Mukesh Ambani यांच्या एका उदाहरणावरून समोर आले आहे. ते त्यांनीच सांगितले आहे.

तुम्ही रिस्क घ्यायला, जोखीम घ्यायला घाबरता? भविष्यात काय होईल याचा अति विचार करता का? आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे एक उदाहरण तुम्ही समजावून घेतले तर तुम्ही कृती केल्याशिवाय राहणार नाही. मुकेश अंबानी यांनी त्यांनी आयुष्यात घेतलेली सर्वात मोठी जोखीम कोणती याची माहिती दिली. त्यांच्या मते हा मोठा रिस्क गेम होता. त्यांना अपयशाच्या कथा ऐकवण्यात येत होत्या. पण हा निर्णयच त्यांच्यासाठी बाजारातील हुकमी पत्ता ठरला.
कोणती आहे ती रिस्क?
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनातील एक किस्सा सांगितला. 2016 मध्ये रिलायन्स जिओ त्यांनी बाजारात आणले. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम असल्याचे ते म्हणाले. भारताच्या डिजिटल युगात हे मोठे पाऊल होते. जिओ ही इंटरनेट युगाची जणू क्रांतीच होती. जिओने इंटरनेटच्या जगतात अविश्वसनीय बदल घडवून आणला. अनेक जण हा निर्णय चुकीचा असल्याचे भाकीत करत होते. पण आपण ही रिस्क, जोखीम पत्करली आणि जिओ हा बाजारातील सर्वात मोठा खेळाडू झाला असे ते म्हणाले.
भारतात मोठे परिवर्तन घडले
McKinsey & Co च्या मंचावर आशियातील या श्रीमंताने रिलायन्सच्या यशाची वाट कशी सुकर झाली याचे भाकीत केले. मुलाखतीत त्यांनी, भारतात 4 जी मोबाईल नेटवर्कच्या पायाभूत सोयी-सुविधा आणण्याचा आम्ही विचार केला. मी संचालक मंडळासमोर याविषयीचा प्रस्ताव मांडला. मी माझ्या भावना मांडल्या. मला अनेक तज्ज्ञांनी भारत अशा डिजिटल सेवेसाठी तयार आहे का असा खोचक सवाल केला. त्यांच्या बोलण्याचा रोख मला माहिती होता.
पण मी माझ्या संचालक मंडळाला सांगितले की, सर्वात वाईट स्थितीत आपण फारशी कमाई करू शकणार नाही. ठीक आहे. कारण आपलाच पैसा आहे. पण आम्ही निर्णयाची अंमलबजावणी केली आणि भारतात डिजटलयाझेशनसाठी आपण काही तरी केले याचे समाधान मिळाले. हा निर्णय योग्य ठरला आणि भारतात मोठे परिवर्तन आले.
रिकाम्या हाती येणार, तसेच जाणार
“तुम्ही या जगात काहीएक घेऊन येत नाहीत आणि तुम्ही काहीच न घेता या जगाचा निरोप घेता. मग तुमच्यामागे काय शिल्लक उरत तर, ती आहे संस्था”, यावर आमचा विश्वास असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले. जिओ हा सध्या भारतातील दूरसंचार क्षेत्रातील मोठा खेळाडू आहे. 470 दशलक्ष ग्राहकांचे हे विशाल नेटवर्क आहे. 5जी, क्लाउड कम्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता याक्षेत्रात या समूहाने मोठी आघाडी घेतली आहे.
