मुकेश अंबानी यांच्या खेळीने पेप्सी अन् कोका कोलाची उडाली झोप, कोल्ड ड्रिंकच्या क्षेत्रात…

mukesh ambani campa cola: मुकेश अंबानी कॅम्पा कोला रिटेलर्सला जास्त कमिशन देत आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त दुकानात पोहचत आहे. रिटेलर्सला कॅम्पा कोलासाठी 6-8% मार्जिन आहे तर इतर कंपन्या 3.5 ते 5% मार्जिन देत आहे.

मुकेश अंबानी यांच्या खेळीने पेप्सी अन् कोका कोलाची उडाली झोप, कोल्ड ड्रिंकच्या क्षेत्रात...
mukesh ambani campa cola
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 9:58 AM

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी उद्योगाचा विस्तार अनेक क्षेत्रात केला आहे. कोल्ड ड्रिंकच्या क्षेत्रात मुकेश अंबानी यांनी काही वर्षांपूर्वी प्रवेश केला आहे. या क्षेत्रातील जुनी कंपनी कॅम्पा कोलाचे त्यांनी अधिग्रहण केले होते. त्यानंतर मार्केटमध्ये प्रॉडक्ट रिलॉन्च केले आहे. कॅम्पा कोलाची कमी किंमत आणि मार्केटिंग स्ट्रेटेजीमुळे पेप्सिको आणि कोका कोला या कंपन्यांची झोप उडली आहे. त्यामुळे आता कोल्ड ड्रिंकमध्ये प्राइस वॉर दिसण्याची शक्यता आहे.

कॅम्पा कोला जुना ब्रँड

कॅम्पा कोला देशातील लोकल ब्रँड आहे. त्याची सुरुवात 1970 च्या दशकात मोहन सिंह यांनी केली होती. त्यानंतर हा ब्रँड घराघरात पोहचला होता. त्यानंतर 1990 च्या दशकात विदेशी कंपनी पेप्सिकोची पेप्सी आणि कोका कोला कंपनीचे कोक मार्केटमध्ये आले. त्यानंतर कॅम्पा कोला या दोन्ही कंपन्यांचे आव्हान पेलू शकली नाही. मग 2022 मध्ये मुकेश अंबानी यांनी या कंपनीस 22 कोटीत विकत घेतले होते.

किंमतीवरुन कॅम्पा कोलाने पेप्सी आणि कोका कोला यांना जेरीस आणले आहे. कॅम्पा कोलाच्या 200 मिलीच्या बॉटलची किंमत 10 रुपये ठेवली आहे. त्यानंतर कोका कोला आणि पेप्सिकोने त्यांच्या 250 मिली कोल्ड ड्रिंकची किंमत 20 रुपये ठेवली आहे. आता त्यांना कॅम्पा कोलामुळे बसत असलेल्या फटक्यामुळे या कंपन्या किंमत कमी करण्याचा विचार करत आहेत.

हे सुद्धा वाचा

आता या क्षेत्रात उतरणार

मुकेश अंबानी कॅम्पा कोला रिटेलर्सला जास्त कमिशन देत आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त दुकानात पोहचत आहे. रिटेलर्सला कॅम्पा कोलासाठी 6-8% मार्जिन आहे तर इतर कंपन्या 3.5 ते 5% मार्जिन देत आहे.

पेप्सिको आणि कोका कोला कंपन्या काही स्नॅक्स विकतात. त्यात पेप्सिकोच्या स्नॅक्सची संख्या जास्त आहे. लेज चिप्स, कुरकुरे हे त्यांचे प्रमुख प्रॉडक्ट आहे. आता रिलायन्स कंज्यूमर प्रॉडक्ट्ससुद्धा स्नॅक्सच्या मार्केटमध्ये उतरण्याची तयारी करत आहे. यामुळे कोल्ड ड्रिक्स वॉर आता स्नॅक्स वॉरमध्ये बदलणार आहे. रिलायन्स चिप्स, नमकीन आमि बिस्कुट आणण्याची तयारी करत आहे.

शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.