मुकेश अंबानी, गौतम अदानी, एलन मस्क यांची संपत्ती एकत्र केल्यावरही या परिवाराची संपत्ती अधिक

Mukesh Ambani Gautam Adani net worth: हाउस ऑफ सऊद सत्तेत आल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत अन् शक्तीशाली परिवार बनला आहे. या परिवारात जवळपास 15,000 सदस्य आहेत. त्यांची बहुतांश संपत्ती 2,000 लोकांच्या एका मुख्य समुहाकडे आहे. या परिवाराची कमाई त्यांच्याकडे असलेल्या विशाल तेल भंडार आणि गुंतवणुकीत येते.

मुकेश अंबानी, गौतम अदानी, एलन मस्क यांची संपत्ती एकत्र केल्यावरही या परिवाराची संपत्ती अधिक
Mukesh Ambani Gautam Adani
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 12:08 PM

Mukesh Ambani Gautam Adani net worth: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योग घराणे मुकेश अंबानी यांचे आहे. मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केल्यावरसुद्धा सौदी अरेबियामधील शाही परिवाराची संपत्ती जास्त आहे. त्यांची संपत्ती 1.4 ट्रिलियन डॉलरपेक्षाही जास्त आहे. एलन मस्क, मुकेश अंबानी, रतन टाटा आणि गौतम अदानीसारख्या अब्जाधिशांपेक्षाही ही संपत्ती जास्त आहे.

संपत्ती 18 अब्ज डॉलर

हाउस ऑफ सऊद सत्तेत आल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत अन् शक्तीशाली परिवार बनला आहे. या परिवारात जवळपास 15,000 सदस्य आहेत. त्यांची बहुतांश संपत्ती 2,000 लोकांच्या एका मुख्य समुहाकडे आहे. या परिवाराची कमाई त्यांच्याकडे असलेल्या विशाल तेल भंडार आणि गुंतवणुकीत येते. हाउस ऑफ सऊद परिवाराचे नेतृत्व किंग सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद करतात. त्यांची संपत्ती 18 अब्ज डॉलर आहे. या परिवारातील आणखी एक सदस्य प्रिन्स अलवलीद बिन तलाल याच्याजवळ 13.4 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ही आकडेवारी वेळोवेळी बदलत असते.

घरात 1,000 खोल्या…

अल यममाह पॅलेस सऊदी अरब शासक परिवाराचे अधिकृत निवासस्थान आहे. 1983 मध्ये बनलेले हे भव्य महल 40 लाख वर्ग फुटांचे आहे. त्यात पारंपारिक नक्षीकाम केले आहे. या घरात 1,000 खोल्या आहेत. एक भव्य मुव्ही थियेटर, बॉलिंग एली, अनेक स्विमिंग पूल आणि एक मशीदसुद्धा आहे. या राजघराण्याकडे अल-आवजा पॅलेस सारख्या इतर अनेक राजवाडे आहेत. त्याठिकाणी पाहुण्याची व्यवस्था केली जाते. मध्य रियाधमधील एर्ग पॅलेस हे कुटुंबाचे कार्यालय आहे.

हे सुद्धा वाचा

विमाने, नौका अन् गाड्यांचा ताफा

प्रिन्स अब्दुलाझीझी यांच्याकडे आणखी 484 फूट लांबीची नौका आहे. त्यात जिम आणि स्विमिंग पूल आहे. तसेच त्यांच्याकडे बोईंग 747-400 आहे. त्यांच्याकडे लक्झरी कारचाही ताफा आहे. सौदीचे अब्जाधीश तुर्की बिन अब्दुल्ला यांच्याकडे $22 दशलक्ष किमतीच्या कारचा संग्रह आहे. यामध्ये लॅम्बोर्गिनी ॲव्हेंटाडोर सुपरव्हेलोस, रोल्स-रॉइस फँटम कूपे आणि सोन्याचा मुलामा असलेला लॅम्बोर्गिनी ॲव्हेंटाडोर एसव्ही सारख्या उच्च श्रेणीतील मॉडेल्सचा समावेश आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.