मुकेश अंबानींचा बडा धमाका, एलआयसीपेक्षा मोठा IPO लाँच करण्याच्या तयारीत

मुकेश अंबानी जियो आणि रिटेल व्यवसायाचा वेगळा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. हा आयपीओ 50 -75 हजार कोटींपर्यंत असू शकतो. वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुकेश अंबानींचा बडा धमाका, एलआयसीपेक्षा मोठा IPO लाँच करण्याच्या तयारीत
अदानींना अंबानीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 12:45 PM

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनपेक्षा मोठा आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा आयपीओ रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल व्हेंचरचा असेल. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. टेलीकॉम आणि रिटेल व्यवसाय पेट्रो केमिकल्स (Petrochemicals) व्यवसायापासून वेगळे करण्याची अंबानींची योजना आहे. दोन्ही कंपन्यांचा आयपीओ 50-75 हजार कोटींच्या दरम्यान असू शकतो. ‘हिंदू बिझनेस लाइन’कडून ही माहिती देण्यात आली आहे. जर हा आकडा खरा निघाला तर भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ असेल, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. एका अहवालानुसार, मुकेश अंबानी यांची, रिलायन्स जिओच्या स्टॉकची यूएस स्टॉक मार्केट नॅस्डॅकमध्ये देखील यादी करण्याची योजना आहे. टेक कंपन्यांसाठी ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. डिसेंबर 2022 पर्यंत रिलायन्स रिटेलचा आयपीओ येईल असे मानले जाते. यानंतर जिओ वेगळे केले जाउ शकते.

सध्या पेटीएमचा आयपीओ सर्वात मोठा

सध्या पेटीएमचा 18300 कोटींचा आयपीओ हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ आहे. एलआयसीचा आयपीओ त्यापेक्षा मोठा असून तो 21 हजार कोटींचा असेल. एलआयसीचा आयपीओ 4 मे रोजी उघडेल आणि 9 मे रोजी बंद होईल. सध्या पेटीएम नंतरचा सर्वात मोठा आयपीओ कोल इंडियाचा असून तो 2010 मध्ये 15500 कोटींवर आला होता. 2008 मध्ये रिलायन्स पॉवरचा 11700 कोटींचा आयपीओ होता, जो सध्याचा तिसरा सर्वात मोठा आयपीओ आहे.

मार्केट कॅप 19 लाख कोटींच्या पुढे

रिलायन्सच्या स्टॉकने अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. या समभागाने गेल्या एका महिन्यात 7 टक्के, तीन महिन्यांत 20 टक्के, या वर्षी आतापर्यंत 18 टक्के आणि गेल्या वर्षभरात 38 टक्के परतावा दिला आहे. अलीकडेच, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपने 19 लाख कोटींची ऐतिहासिक पातळी ओलांडली आहे. पहिल्यांदाच एखाद्या भारतीय कंपनीचे मार्केट कॅप 19 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

जियोचे 40 कोटींहून अधिक युजर्स

जियोबद्दल बोलायचे झाले तर ती भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. तसेच फेब्रुवारीत त्याच्या युजर्समध्ये घट झाली होती. रिलायन्स जियो आणि वोडाफोन आयडियाने मोबाईल सर्व्हिस सेगमेंटमध्ये त्यांच्या युसर्जना गमावले आहे. ग्राहक डेटा अहवालात असे म्हटले आहे, की एअरटेल ही एकमेव कंपनी आहे जिने फेब्रुवारीच्या कालावधीत मोबाईल सेगमेंटमध्ये युजर्सना जोडले आहेत. हा अहवाल भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जारी केला आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.