AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : IPO पूर्वी रिलायन्स रिटेलमध्ये मोठी घडामोड, इतका टक्के वाटा विकणार

Mukesh Ambani : रिलायन्स रिटेलच्या आयपीओपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज रिटेलमधील 8-10 टक्के हिस्सेदारी विक्री करण्याची योजना आहे. कंपनीचा विस्तार, कर्ज चुकविणे, रिटेल बिझनेस, तसेच आयपीओच्या तयारीसाठी हा वाटा विक्री करण्यात येत असल्याचा सांगण्यात येत आहे.

Mukesh Ambani : IPO पूर्वी रिलायन्स रिटेलमध्ये मोठी घडामोड, इतका टक्के वाटा विकणार
| Updated on: Aug 25, 2023 | 7:12 PM
Share

नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा (RIL) रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमधील (RRVL) 8-10 टक्के अधिकचा वाटा विक्री करु शकतो. ही रक्कम कंपनीचा विस्तार करणे, कर्ज चुकविण्यासाठी, रिटेल बिझनेस वाढवण्यासाठी तसेच बाजारात आयपीओच्या तयारीसाठी हा वाटा विक्री करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही प्रक्रिया 12 ते 15 महिन्यांत पूर्ण करण्यात येऊ शकते. ही प्रक्रिये रिलायन्स रिटेलचा प्रस्तावित आयपीओसाठी महत्वाची ठरणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतरच कंपनी आयपीओ बाजारात आणण्याची शक्यता आहे. दरम्यान रिलायन्स रिटेलने तरुणाईसाठी हैदराबाद येथे नवीन Yousta स्टोअर सुरु केले. फॅशनबल कपड्यांच्या या स्टोअरमध्ये स्वस्तात कपडे मिळतील.

का विक्री करण्यात येत आहे वाटा

ही शेअर विक्री महत्वपूर्ण आहे. कारण 100 अब्ज डॉलर म्हणजे 8.25 लाख कोटी रुपयांचे सध्याचे मुल्यांकन आहे. त्यामुळे RRVL च्या आयपीओचा आकार मोठा होईल. बाजारात इतकी मोठी ऑफर आणल्यास तेवढी तरळता नसेल. त्यामुळेच कंपनी 7-10 टक्के वाटा विक्री करेल. त्यातून आयपीओची साईज ठरविण्यात येईल. त्यातून आयपीओ यशस्वी होण्याची शक्यता आहे.

25% पब्लिक होल्डिंग

भारताच्या लिस्टिंग नियमानुसार, कोणत्याही कंपनीचे पब्लिक होल्डिंग, ज्यामध्ये गुंतवणूकदारांची हिस्सेदारीचा सहभाग आहे, ती कमीत कमी 25 असणे आवश्यक आहे. यावेळी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये जवळपास 11 टक्के गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांची आहे. यामध्ये कतर गुंतवणूक प्राधिकरणाचा समावेश आहे. बुधवारी या प्राधिकरणाने 0.99% हिस्सेदारीसाठी 8,278 कोटींची गुंतवणूक केली. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये 89 टक्के कमी वाटा आहे. या कंपनीत काही छोट्या गुंतवणूकदारांचा पण शेअर आहे.

आयपीओसाठी सुरु आहे ही कसरत

सध्याच्या मुल्यांकनाचा आधारावर रिलायन्स रिटेल आयपीओचा निर्णय घेतला तर जवळपास 1.15 लाख कोटी रुपयांच्या 14 टक्के शेअर डायल्यूट करावे लागतील. या आयपीओचा आकार खूप मोठा होईल. त्यामुळे आयपीओ यशस्वी होण्याचे प्रमाण खूप कमी होईल. त्यामुळेच रिलायन्स इंडस्ट्रीज आयपीओपूर्वी आरआरव्हीएलमधील इक्विटी विक्रीची योजना तयार करत आहे.

नवीन स्टोअर

रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेडने (RRVL) नवीन फॅशन रिटेल फॉर्मेट सुरुवात केली आहे. कंपनीने तरुणाईसाठी खास Yousta स्टोअरची सुरुवात केली आहे. कंपनीने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, RRVL ने त्यांच्या पहिल्या Yousta स्टोअरची सुरुवात हैदराबाद येथे सुरु केली आहे. कंपनी देशभरात RRVL 200 Yousta स्टोअर सुरु करणार आहे. यावर्षीच्या अखेरपर्यंत ही स्टोअर देशभर उघडण्यात येईल.

मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.