मुकेश अंबानी भारताबाहेर कुठेही स्थलांतर करणार नाहीत, ते वृत्त चुकीचं, रिलायन्सचं स्पष्टीकरण

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 05, 2021 | 9:39 PM

एका वृत्तपत्रातील अलीकडच्या बातमीत अंबानी कुटुंब लंडनच्या स्टोक पार्कमध्ये अंशतः वास्तव्य करणार असल्याचं सांगितलंय. पण ते वृत्त खोडसाळ असून, सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीनं व्हायरल झालंय, असंही रिलायन्सनं दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलंय.

मुकेश अंबानी भारताबाहेर कुठेही स्थलांतर करणार नाहीत, ते वृत्त चुकीचं, रिलायन्सचं स्पष्टीकरण
mukesh amabni
Follow us

मुंबईः रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय आता त्यांचा मुक्काम लवकरच लंडनमध्ये हलवणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं रिलायन्सनं स्पष्ट केलंय. रिलायन्स समूहानं एक निवेदन जारी करत या सर्व प्रकरणावर खुलासा केलाय. तसेच एक वृत्तपत्रानं चुकीच्या पद्धतीची बातमी दिल्याचाही रिलायन्सनं आपल्या निवेदनात उल्लेख केलाय.

ते वृत्त खोडसाळ, सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीनं व्हायरल

एका वृत्तपत्रातील अलीकडच्या बातमीत अंबानी कुटुंब लंडनच्या स्टोक पार्कमध्ये अंशतः वास्तव्य करणार असल्याचं सांगितलंय. पण ते वृत्त खोडसाळ असून, सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीनं व्हायरल झालंय, असंही रिलायन्सनं दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलंय. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि त्यांच्या कुटुंबाची लंडन किंवा जगात कोठेही स्थलांतर करण्याची किंवा राहण्याची कोणतीही योजना नाही, असंही स्पष्ट केलंय.

त्या जागेवर गोल्फिंग आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट उभारणार

RIL समूहाची उपकंपनी RIIHL जिने अलीकडेच स्टोक पार्क मालमत्ता खरेदी केलीय. ती मालमत्ता वारसा ठिकाण असून, त्या जागेवर एक प्रमुख गोल्फिंग आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट उभारण्याचा आमचा उद्देश आहे. तसेच नियोजन मार्गदर्शक तत्त्वे आणि स्थानिक नियमांचे पूर्णपणे पालन करूनच आम्ही ते विकसित करणार आहोत. यामुळे समूहाच्या वेगाने वाढणाऱ्या ग्राहक व्यवसायात भर पडेल. त्याच बरोबर ते भारताच्या प्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा जागतिक स्तरावर विस्तार करेल, असंही निवेदनात रिलायन्सनं म्हटलंय.

स्टोक पार्क हा एखाद्या राजप्रासादाप्रमाणे, त्यात 49 बेडरुम्स

विशेष म्हणजे ‘मिड डे’ या इंग्रजी दैनिकानं यासंदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्यात स्टोक पार्क हा एखाद्या राजप्रासादाप्रमाणे असून, त्यामध्ये 49 बेडरुम्स असल्याचं सांगितलंय. सध्या याठिकाणी अंबानी कुटुंबीयांच्या गरजेप्रमाणे सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुकेश अंबानी आपल्या कुटुंबीयांसह याठिकाणी राहायला जातील, असेही बातमीत म्हटलेय. स्टोक पार्क हे अंबानी कुटुंबीयांचे सेकंड होम असेल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळातही अंबानी कुटुंबीय रिलायन्सचा तेलशुद्धीकरण प्रकल्प असलेल्या जामनगर येथे जाऊन राहिले होते.

संबंधित बातम्या

Edible Oil Price: खाद्यतेल स्वस्त, किलोमागे 20 रुपयांपर्यंत घसरण

30 नोव्हेंबरनंतर ‘या’ योजनेंतर्गत मोफत रेशन मिळणार नाही, सरकारनं सांगितले ‘कारण’

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI