AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani यांच्या या कंपनीचा शेअर सूसाट, गुंतवणूकदारांना रिटर्न दिला दमदार

Mukesh Ambani | देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या या कंपनीने गुंतवणूकदरांना मालामाल केले आहे. या कंपनीने छप्परफाड रिटर्न दिला आहे. वित्तीय सेवा देणारी ही कंपनी लवकरच धमाका करणार आहे. हा शेअर 14 टक्क्यांनी उसळला आहे. सहा महिन्यात कशी होती कामगिरी?

Mukesh Ambani यांच्या या कंपनीचा शेअर सूसाट, गुंतवणूकदारांना रिटर्न दिला दमदार
| Updated on: Feb 23, 2024 | 4:11 PM
Share

नवी दिल्ली | 23 February 2024 : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नवीन कंपनीने दमदार खेळी खेळली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. रिलायन्स समूहाच्या या कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीतून वेगळे निघाल्यावर दमदार घौडदौड केली आहे. ही कंपनी नुकतीच बाजारात सूचीबद्ध झाली आहे. शुक्रवारी व्यापारी सत्रात या शेअरच्या किंमतीत 14 टक्क्यांची उसळी आली. त्यामुळे गुंतवणूकदारांना मालामाल होता आले.

Jio Financial Services

रिलायन्स समूहाच्या जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरने शुक्रवारी पण घौडदौड सुरु ठेवली. कंपनीचा शेअर सातत्याने 5 व्या दिवशी वधारला. हा शेअर व्यापारी सत्रात 14 टक्क्यांहून अधिक वधारला. हा शेअर 347 रुपयांवर पोहचला. जानेवारी 2024 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत या शेअरच्या किंमतीत 44% पर्यंतची वाढ दिसून आली.

बाजारातील भांडवल 2 लाख कोटींपेक्षा अधिक

  • जिओ फायनेन्सिअल सर्व्हिसेजच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी आली. त्यानंतर कंपनीचे बाजारातील भांडवल 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढले. सकाळच्या व्यापारात जिओ फायनेन्शिअलचा शेअर 8 टक्क्यांच्य वाढीसह 326 रुपयांवर उघडला. तर व्यापारी सत्रात हा शेअर 347 रुपयांचा उच्चांकावर पोहचला.
  • गेल्या पाच दिवसात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 23.67 टक्क्यांची वाढ झाली. तर एका महिन्यात या शेअरची किंमत 41.20 टक्के इतकी वाढली. कंपनी सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनीच्या शेअरची किंमत 58.16 टक्क्यांनी वाढली आहे.

गुंतवणूकदारांकडे छप्परफाड पैसा

जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसचा आयपीओ 265 रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर होता. ऑगस्ट 2023 मध्ये शेअर बाजारात कंपनी सूचीबद्ध झाली. त्यावेळी हा शेअर 214 रुपयापर्यंत खाली आला. तर त्यानंतर त्यात घसरण झाली. हा शेअर 204 रुपयांपर्यंत घसरला. पण केवळ 6 महिन्यातच या शेअरने कमाल दाखवली. या शेअरने कमाल उसळी दाखवली. या शेअरने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या माध्यमातून वेगळा व्यवसाय सुरु केला आहे. ही कंपनी लवकरच विमा क्षेत्रात पण उतरणार आहे.

असा मजबूत आहे डेटा बेस

रिलायन्स इंडस्ट्रीजकडे ग्राहकांचा मोठा आकडा ही जमेची बाजू आहे. रिलायन्स रिटेल सध्या जवळपास 25 कोटी ग्राहकांना सेवा देत आहे. तर जिओ सध्या 44 कोटी ग्राहकांना सेवा देत आहे. त्यामुळे जिओ फायनेन्शिअलकडे मोठा डेटा बेस आहे. येत्या काही दिवसांत या सर्व बाबींचा मोठा फायदा शेअर बाजारात होईल. गुंतवणूकदारांना लॉटरी लागू शकते.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.