Multibagger penny stocks | शेअर बाजारात या त्रिदेवचा धमाका! केवळ 15 दिवसांत पैसे दुप्पट

Multibagger penny stocks | अवघ्या 15 दिवसांत 3 शेअर्सने शेअर बाजारात धुमाकूळ घातला आहे. त्यांनी केवळ 15 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. हे स्टॉक्स रिजन्सी सिरॅमिक, हरिया अॅपारेल्सHaria Apparels आणि कोरे फूड्स Kore Foods आहेत, ज्यांची किंमत 9 रुपयांपेक्षा कमी आहे.

Multibagger penny stocks | शेअर बाजारात या त्रिदेवचा धमाका! केवळ 15 दिवसांत पैसे दुप्पट
पैसा झाला दुप्पट Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 1:52 PM

Multibagger penny stocks | तर बातमी जशी धमाकेदार आहे, तशीच जोखीम ही तगडी आहे मंडळी, त्यामुळे केवळ बातमीने हुरळून जाऊन नका. तर अभ्यासून गुंतवावे हे धोरण लक्षात ठेवा. पण बाजार ही संधी आहे, ज्याला संधीचा फायदा उचलता येतो, तो कमाई करतो, एवढं सोप्पं सूत्र आहे बघा. म्हणायला हे छोटे पहेलवान, पण गुंतवणूकदारांना (Investor) त्यांनी मालामाल केले आहे. अवघ्या 15 दिवसांत त्यांनी हा करिष्मा केला आहे. या 3 शेअर्संनी (Shares) केवळ 15 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट (Double the money) केले आहेत. रिजन्सी सिरॅमिक (Regency Ceramic), हरिया अॅपॅरल्स (Haria Apparels) आणि कोरे फूड्स (Kore Foods) हे ती स्टॉक्स असून, त्यांची किंमत 9 रुपयांपेक्षा कमी आहे. पेनी स्टॉक्स कितीही करिष्माई असले तरी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि अभ्यास करावा. कारण मेहनतीचा पैसा कापरासारखा भूर्रकन उडून जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

रिजन्सी सिरॅमिकची कथा

सर्वात अगोदर, रिजन्सी सिरॅमिक (Regency Ceramic) मंगळवारी हा शेअर 4.94 टक्क्यांनी वधारून 5.30 रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी, 29 जुलै 22 रोजी त्याची किंमत 6.05 रुपये आहे. गेल्या 15 दिवसांत 105.42 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या एका आठवड्यात शेअरने 24.71 टक्के तर एका महिन्यात 130.43 टक्के रिटर्न दिला आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यांत 199.64 टक्के परतावा देत गुंतवणूकदारांच्या जवळपास 3 पट रक्कम दिली आहे, तर एका वर्षात सुमारे 470 टक्के रक्कम उडविली आहे. त्याचा 52 आठवड्यांतील उच्चांक 6.05 रुपये असून नीचांकी 1.35 रुपये आहे.

हरिया अॅपारेल्सची कामगिरी

त्याचप्रमाणे हरिया अॅपारेल्सची (Haria Apparels) कामगिरी जोरदार आहे. मंगळवारी हा शेअर 4.89 टक्क्यांनी वाढून 5.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर शुक्रवारी, 29 जुलै 22 रोजी त्याची किंमत 6.68 रुपये आहे. गेल्या 15 दिवसांत तो 103.87 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 5 वर्षांपासून हा शेअर चांगली कामगिरी करत आहे. एका आठवड्यात सुमारे 27 टक्के तर एका महिन्यात सुमारे 183 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या तीन महिन्यांत 235 टक्के तर वर्षभरात 286टक्के परतावा दिला आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 6.68 रुपये असून सर्वात कमी म्हणजे 1.17 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

Kore Foods दमदार खेळाडू

15 दिवसांत 100 टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या पेनी स्टॉकमधील तिसरे नाव म्हणजे कोरे फूड्स (Kore Foods). या काळात हा शेअर 102 टक्क्यांनी वधारला आहे. मंगळवारी तो 4.9 टक्क्यांनी वधारला आणि एका आठवड्यात 27 टक्क्यांनी वधारला. तर शुक्रवारी, 29 जुलै 22 रोजी त्याची किंमत 8.17 रुपये आहे. अवघ्या एका महिन्यात त्याने 180 टक्के विमान प्रवास केला आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांत त्यात 210% वाढ झाली आहे. एका वर्षात 134 टक्के रिटर्न दिला आहे. त्याचा 52आठवड्यांचा उच्चांक 8.17 रुपये असून नीचांकी 1.73 रुपये आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.