AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Share : या शेअरने दिला जोरदार परतावा! 10 वर्षांत दहा हजारांचे झाले इतके

Multibagger Share : या शेअरने गुंतवणूकदारांचे काही वर्षांतच वारे न्यारे केले आहेत. या शेअरमुळे त्यांना जोरदार फायदा झाला. गुंतवणूकदारांना गेल्या 10 वर्षांत दहा हजारांच्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळाला. तिमाही निकालात या कंपनीच्या नफ्यात पण वाढ झाली आहे.

Multibagger Share : या शेअरने दिला जोरदार परतावा! 10 वर्षांत दहा हजारांचे झाले इतके
| Updated on: Aug 26, 2023 | 7:28 PM
Share

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : या मल्टिबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. गेल्या 10 वर्षांत शिवालिक बायमेटल कंट्रोल्सच्या (Shivalik Bimetal Controls Ltd) शेअरने कमाल रिटर्न दिले. या शेअरमध्ये या काळात 17,600 टक्क्यांची मोठी वाढ दिसून आली. या काळात गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिले. 10 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता ही रक्कम 17 लाख रुपये असती. गेल्या 10 वर्षांत कंपनीचा शेअर 2 रुपयांहून 550 रुपयांवर पोहचला. काही शेअर मल्टिबॅगर ठरतात. त्यासाठी कंपनीचा, शेअर बाजाराचा अभ्यास असणे गरजेचे आहे. बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला पण मोलाचा ठरतो.

कशी आहे कामगिरी

गेल्या तीन वर्षांत या शेअरने 2150 वाढ नोंदवत मोठा परतावा दिला. गेल्या एका वर्षांत शिवालिक बायमेटल कंट्रोल्स लिमिटेडने 51.76 टक्के परतावा दिला. शुक्रवारी बाजार बंद होताना कंपनीचा शेअर 556 रुपयांवर व्यापार करत होता. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 730 रुपये आहे.

कंपनी काय करते

शिवालिक बायमेटल कंट्रोल्स ही कंपनी डिफ्यूजन बॉन्डिंग, इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग, सोल्डर रिफ्लो आणि रेजिस्टेंस वेल्डिंग अशा विभिन्न प्रकारात जोरदार काम करते. मोठमोठ्या प्रकल्पात वस्तू जोडणे हे या कंपनीचे काम आहे. कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 3,204 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीचा EPS 13.22 आहे. हा स्टॉक सध्या 12.57 PB वर व्यापार करत आहे. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, प्रमोटर्सकडे 60.61 टक्के वाटा आहे. तर उर्वरीत 39.39 हिस्सेदारी पब्लिक शेअर होल्डर्सकडे आहे.

तिमाही नफ्यात किती वाढ

पब्लिक शेअरहोल्डर्समध्ये म्युच्युअल फंड आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडे या कंपनीत कोणताच स्टेक नाही. पण स्थानिक गुंतवणूकदारांनी मोठा डाव खेळला आहे. त्यांचा या कंपनीत 25 टक्के वाटा आहे. शिवालिक बायमेटल्सच्या पहिल्या तिमाहीचा नफा 18 टक्के वाढून 20.23 कोटी रुपये असेल. तर ऑपरेशनल कमाई 16 टक्क्यांहून वाढून 113.07 कोटी रुपयांवर पोहचली आहे.

हा शेअर पण नाही मागे

डिसेंबर 1998 साली भारत फोर्ज कंपनीचा एक शेअर केवळ 4 रुपयांना होता. तेव्हापासून कंपनीची घौडदौड सुरु आहे. या शेअरमध्ये 225 पट तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 2020 साली तेजी दिसून आली. या वर्षी सुद्धा या शेअरने मोठी कामगिरी बजावली. आतापर्यंत या स्टॉकने 13 टक्क्यांची वाढ नोंदवली. 2022 मध्ये संरक्षण क्षेत्रातील या स्टॉकने 33 टक्के परतावा दिला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.