Multibagger Share | लॉलीपॉपच्या किंमतीत मिळतोय शेअर; घोटाळ्यांची मालिका तरीही PSU कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Multibagger Penny Stock | या पेनी स्टॉकची किंमत एका लॉलीपॉपपेक्षा पण कमी आहे. पण यामध्ये अनेक बड्या कंपन्यांनी गुंतवणूक वाढवली आहे. या स्टॉकमध्ये पाच सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या स्टॉकने अगदी कमी कालावधीत मोठी झेप घेतल्याने हा स्टॉक मल्टिबॅगर ठरला आहे.

Multibagger Share | लॉलीपॉपच्या किंमतीत मिळतोय शेअर; घोटाळ्यांची मालिका तरीही PSU कंपन्यांची मोठी गुंतवणूक
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 10:04 AM

नवी दिल्ली | 9 March 2024 : पेनी स्टॉक, जीटीएल इंन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरची किंमत (GTL Infrastructure Share Price) सध्या 1.85 रुपये इतकी आहे. पण एकाच वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. या शेअरने 115 टक्क्यांचा परतावा दिला आहेर. या छोटुरामवर अनेक बड्या कंपन्या फिदा आहेत. एलआयसीसह सार्वजनिक उपक्रमातील 4 कंपन्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. हा स्टॉक भविष्यातील लंबी रेस का घोडा ठरू शकतो. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक वाढत आहे.

हा धोका पण ओळखा

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरने गेल्या सहा महिन्यात 60 टक्क्यांचा परतावा दिला आहे. वर्ष 2024 मध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 37 टक्क्यांचा नफा झाला आहे. येथे एक धोका पण आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने, सीबीआयने जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरविरोधात 4,063 कोटींच्या कथित बँक फसवणूकीप्रकरणात दुसरा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात चौकशी सुरु आहे. तर पहिला गुन्हा हा 4500 कोटींच्या कथित घोटाळ्यासंबंधी आहे. तरी पण एकाही सार्वजनिक उपक्रमातील कंपनीने यातून गुंतवणूक कमी केलेली नाही, हे विशेष.

हे सुद्धा वाचा

कोणाची किती गुंतवणूक?

  1. LIC – चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीनुसार, एलआयसीकडे जीटीएल कंपनीचे 42,61,77,058 शेअर, 3.33 टक्के वाटा आहे.
  2. Bank of Baroda – या बँकेकडे जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरचे 5.68 टक्के वा 72,79,74,981 शेअर आहेत. अनेक दिवसांपासून या कंपनीत बँकेची शेअर होल्डिंग आहे.
  3. Canara Bank – Q3FY24 मध्ये कॅनेरा बँकेकडे या कंपनीचे 51,91,15,428 शेअर होते. एकूण शेअरच्या हे 4.05 टक्के आहे. बँकेने दोन तिमाहीत या कंपनीतील हिस्सेदारी कायम ठेवली आहे.
  4. Central Bank – डिसेंबर 2023 तिमाहीत जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या पेनी स्टॉकमध्ये 94,21,54,365 वा 7.36 टक्क्यांची गुंतवणूक केली आहे. गेल्या दोन तिमाहीत ही गुंतवणूक कमी झालेली नाही.
  5. Union Bank Of India – या बँकेने पण GTL इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलेली आहे. डिसेंबर तिमाहीत बँकेकडे या कंपनीचे 1,54,62,71,529 शेअर होते. एकूण शेअरमध्ये हा वाटा 12.07 टक्के आहे. दोन तिमाहीत त्यात बदल झालेला नाही.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.