Multibagger Stock : या स्टॉकच्या किंमतीत चार लेमन गोळ्या; चार वर्षांत करोडपती झाले गुंतवणूकदार

SG Finserve कंपनीचे बाजारातील भांडवल 2260 कोटी रुपये आहे. 2 रुपयांहून हा स्टॉक 430 रुपयांवर पोहचला. या स्टॉकने गुंतवणूकदारांचे वारे-न्यारे केले आहे. या 4 वर्षांत 16,000 टक्क्यांचाा जोरदार रिटर्न दिला. एक लाख रुपयांची या स्टॉकने इतक्या कोटींचा परतावा दिला आहे..

Multibagger Stock : या स्टॉकच्या किंमतीत चार लेमन गोळ्या; चार वर्षांत करोडपती झाले गुंतवणूकदार
मल्टिबॅगर शेअर सूसाट
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 3:22 PM

शेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरु असते. आज सेन्सेक्स 300 अंकांपेक्षा अधिकने घसरला. तर एनएसई सूचीतील 1,758 शेअर्समध्ये जोरदार उसळी दिसून आली. तर 620 शेअरमध्ये घसरण झाली. 223 शेअर अप्पर सर्किटमध्ये व्यापार करत होते. पण 2 रुपयांच्या या शेअरने सर्वांची मने जिंकून घेतली. अवघ्या चारच वर्षात SG Finserve कंपनीचा शेअर मल्टिबॅगर ठरला. ज्यांनी चार वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली असते, ते आज करोडपती झाले असते.

430 रुपयांपेक्षा अधिक शेअरची किंमत

वर्ष 1994 मध्ये एसजी फिनसर्व्ह लिमिटेड सुरु झाली. ब्रोकिंग, डिस्ट्रिब्युटर्स, गुंतवणुकीसह फंड व्यवस्थापन, बँकिंग आणि विमा सेवा ही कंपनी देते. या स्टॉकने केवळ चार वर्षांत 2 रुपयांहून 430 रुपयांपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. गेल्या 27 मार्च 2020 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमती केवळ 2.80 रुपये होती. मंगळवारी शेअर बाजारात व्यापारी सत्र पूर्ण झाल्यावर हा शेअर 431.80 रुपयांवर बंद झाला.

हे सुद्धा वाचा

1 लाखांचे झाले 1.5 कोटी रुपये

एसजी फिनसर्व्ह लिमिटेडचे बाजारातील भांडवल 2260 कोटी रुपये आहे. हा स्टॉक 2 रुपयांहून 430 रुपयांपर्यंत वाढला. या स्टॉकने त्याच्या गुंतवणूकदारांना या 4 वर्षांत जवळपास 16,000 टक्क्यांचा जोरदार रिटर्न दिला. या हिशोबाने या शेअरने त्यांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केले. एखाद्या गुंतवणूकदाराने एसजी फिनसर्व्हचा प्रति शेअर 2.80 रुपयांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आणि हे शेअर विक्री केले नसते तर ही रक्कम वाढून आज 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहचली असती.

2023 मध्ये रॉकेटच्या गतीने पळाला शेअर

मार्च 2020 मध्ये या शेअरची किंमत 2.80 रुपये होती. त्यानंतर तो जास्त वेगाने धावू शकला नाही. ऑगस्ट 2021 वर्षांपर्यंत हा स्टॉक 5 रुपयांच्या घरात पोहचला. 31 डिसेंबर 2021 रोजी या स्टॉकने उसळी घेतली. हा शेअर 30 रुपयांवर पोहचला. पुढे हा शेअर सूसाट धावला. 13 जानेवारी 2023 रोजी या शेअरची किंमत रॉकेट सारखी धावली. हा शेअर 560.90 रुपयांवर पोहचला. या शेअरने 26 मे 2023 रोजी 700 रुपयांचा टप्पा गाठला. त्यानंतर हा शेअर झरझर खाली उतरला. सध्या हा शेअर 432.40 रुपयांवर व्यापार करत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.