AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stocks : 48 रुपयांच्या स्टॉकची हनुमान उडी, गुंतवणूकदार झालेत करोडपती

Multibagger Stocks : हॉस्पिटल सेक्टरमधील या कंपनीच्या शेअरने मोठा परतावा दिला आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल 70,019 कोटी रुपये आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीत या शेअरने मोठी उडी घेतली आहे. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे.

Multibagger Stocks : 48 रुपयांच्या स्टॉकची हनुमान उडी, गुंतवणूकदार झालेत करोडपती
| Updated on: Aug 30, 2023 | 6:32 PM
Share

नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : शेअर बाजारात (Share Market) चढउतार सुरुच असतो. काही शेअर गुंतवणूकदारांचे भाग्य बदलवून टाकतात. असाच एक स्टॉक अपोलो हॉस्पिटल एंटरप्राईजेसचा (Apollo Hospital Enterprise Stock) आहे. या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला. एक लाख रुपयांची गुंतवणूक एक कोटी रुपयांची झाली आहे. म्हणजे या स्टॉकने गुंतवणूकदारांना अवघ्या काही वर्षात करोडपती केले आहे. 2003 ते 2023 या कालावधीत या शेअरने रंपाट कमगिरी केली आहे. हा शेअर सातत्याने जोरदार परतावा देत असल्याने गुंतवणूकदार या शेअरवर फिदा आहेत. गेल्या सहा महिन्यात या शेअरने 10.40 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर एका महिन्यात हा शेअर 6 टक्क्यांनी वधारला आहे.

एक लाखांचे झाले एक कोटी

शेअर बाजारात दीर्घकालीन मुदतीत हा स्टॉक मल्टिबॅगर ठरला आहे. गेल्या 20 वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. सुरुवातीलाच या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते आणि ही गुंतवणूक कायम ठेवली असती तर गुंतवणूकदारांना आज एक कोटी रुपयांचा परतावा मिळाला असता. मार्च 2003 पासून ते 29 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत या स्टॉकच्या किंमतीत 4823 रुपयांची वाढ झाली.

20 वर्षांत असा वधारला शेअर

28 मार्च 2023 रोजी या अपोलो हॉस्पिटल इंटरप्रायजेसच्या शेअरचा भाव 48.28 रुपये होता. तर 29 ऑगस्ट 2023 रोजी या स्टॉकची किंमत 4872 रुपये होती. या कंपनीचे बाजारातील भांडवल 70,019 कोटी रुपये आहे. या शेअरमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली. त्यांना मोटा फायदा मिळाला. दीर्घकालीन गुंतवणुकीत जोरदार परतावा मिळाला.

कशी आहे वाटचाल

अपोलो हॉस्पिटल इंटरप्रायजेसचा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकावर, 5,362 रुपयांवर आहे. तर या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 4,078.40 रुपये आहे. मंगळवारी हा स्टॉक 4,938 रुपयांवर पोहचला होता. पण या ट्रेडिंगच्या अंतिम टप्प्यात त्यात 0.60 टक्क्यांची घसरण झाली.

सातत्याने जोरदार कामगिरी

या शेअरने सातत्याने जोरदार कामगिरी केली आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 26,251.35 टक्के इतका परतावा दिला. तर गेल्या पाच वर्षांत या शेअरने 311.34 टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये 13 टक्क्यांहून अधिकची उसळी दिसली.मार्च 2003 पासून ते 29 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत या स्टॉकच्या किंमतीत 4823 रुपयांची वाढ झाली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?