AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धातला सर्वात मोठा गेम, ट्रम्प यांची यु-टर्नची घोषणा, नंतरच्या 20 मिनिटात कोणी कमावले 840 कोटी?

सोमवारी न्यू यॉर्क मधील वेळेनुसार, सकाळी 6.50 AM (भारतीय वेळेनुसार संध्याकाळचे 4:20 वाजता) सीएमई S&P 500 ई मिनी-फ्यूचर्समध्ये अचानक मोठ्या ट्रेडिंगची नोंद झाली.या खेळात एका अज्ञात माणसाने मोठा गेम केलाय. त्याने जवळपास 840 कोटींची कमाई केली आहे.

युद्धातला सर्वात मोठा गेम, ट्रम्प यांची यु-टर्नची घोषणा, नंतरच्या 20 मिनिटात कोणी कमावले 840 कोटी?
Donald Trump-Mojtaba Khamenei
| Updated on: Mar 24, 2026 | 10:49 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अचानक युद्धातला मोठा यु-टर्न घेतला. त्यांनी पुढच्या पाच दिवसांसाठी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नसल्याचं जाहीर केलय. इराणमध्ये ब्लॅकआऊटची धमकी देणारे ट्रम्प इतके अचानक कसे काय पलटले? हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. इराण सोबत पडद्यामागे सकारात्मक चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. पण इराणने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय आहे? अमेरिकेची पुढची रणनिती काय? हा अनेकांना प्रश्न पडला आहे. या सगळ्यामध्ये ट्रम्प यांच्या घोषणेच्या आधी जागतिक बाजारात ट्रेडिंगचा एक रहस्यमयी खेळ झाला. विश्लेषकांनुसार एका अज्ञात ट्रेडरने त्यावेळी 20 मिनिटात 100 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 840 कोटी रुपयांचा फायदा कमावला.

सोमवारी न्यू यॉर्क मधील वेळेनुसार, सकाळी 6.50 AM (भारतीय वेळेनुसार संध्याकाळचे 4:20 वाजता) सीएमई S&P 500 ई मिनी-फ्यूचर्समध्ये अचानक मोठ्या ट्रेडिंगची नोंद झाली. त्याचवेळी कच्चा तेलाच्या बाजारात सुद्धा घडामोडी घडल्या. ही वेळ खूप असामान्य होती. कारण प्री-मार्केट टाइम म्हणजे बाजार उघडण्याच्या आधीची वेळ सामान्यत: त्यावेळी इतकी लिक्विडिटी म्हणजे इतका मोठा देण्या-घेण्याचा व्यवहार होत नाही.

बरोबर 15 मिनिटांनी ट्रम्प यांची घोषणा

या ट्रेडिंगनंतर बरोबर 15 मिनिटांनी सकाळी 7:05 मिनिटांनी ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर अमेरिकेची इराणसोबत चर्चा झाली आहे आणि पुढचे पाच दिवस इराणची वीज संयंत्र तसच ऊर्जेच्या पायाभूत सुविधांवर अमेरिका हल्ले करणार नाही असं जाहीर करण्यात आलं. पण ही घोषणा होण्याच्या काही मिनिटं आधी बाजारात अब्जावधी रुपयांचा व्यवहार झालेला होता.

1.5 अब्ज डॉलर फ्यूचर्सची खरेदी

ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अनयूजुअल व्हेल्सनुसार या रहस्यमयी ट्रेडरने बाजारात दोन ठिकाणी एकाचवेळी पैज लावली. तणाव कमी झाल्याने शेअर बाजारात तेजी येईल या अपेक्षेने त्याने 1.5 अब्ज डॉलर म्हणजे (जवळपास 12,600 कोटी रुपये) फ्यूचर्स खरेदी केले.

किती फ्यूचर्स विकले?

युद्ध संपणार या अपेक्षेने कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाली. 192 मिलियन डॉलर (जवळपास 1,615) कोटी रुपये फ्यूचर्स विकून टाकले.

ट्रम्प यांच्या पोस्टनंतर तसचं झालं

एका मिनिटाच्या छोट्यावेळेत ब्रेंट आणि वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट जवळपास 6,200 फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टच्या देण्या-घेण्याचा व्यवहार झाला. याची किंमत 580 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 4,870 कोटी रुपये आहे. त्यावेळी ही किंमत सामान्य ट्रेड पेक्षा चार ते सहापट जास्त होती. ट्रम्प यांच्या पोस्टनंतर शेअर बाजार तसाच वागला, जशी ट्रेडिंग झाली होती.

इनसाइडर ट्रेडिंगची शक्यता

ओपनिंग बेल आधी S&P 500 फ्यूचर्समध्ये 2.5 टक्के उसळी दिसली.

ब्रेंट क्रूडची किंमत 109 डॉलरवरुन घसरुन 92 डॉलरवर आली.

WTI क्रूड मध्ये जवळपास 6 टक्के घसरण होऊन काहीवेळासाठी 88.70 डॉलर प्रति बॅरल झाली होती.

तेलाच्या किंमतीत झालेल्या या चढ-उतारात 20 मिनिटात 840 कोटी रुपयापेक्षा अधिकचा नफा कमावण्यात आला. यात इनसाइडर ट्रेडिंगची शक्यता आहे.

Follow Us
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार