AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran, Israel, Us, War : इराणचा भारताला सर्वात मोठा धोका; पाकिस्तानचं ऐकून संतापजनक कृत्य, मदतीचीही जाणीव नाही, थेट…

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धकाळात भारत इराणसाठी धावून आला आहे. भारतामधून इराणसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र याचदरम्यान इराणने भारताला मोठा धोका दिला आहे.

Iran, Israel, Us, War : इराणचा भारताला सर्वात मोठा धोका; पाकिस्तानचं ऐकून संतापजनक कृत्य, मदतीचीही जाणीव नाही, थेट...
IranImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 24, 2026 | 9:04 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू होऊन 3 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र हे युद्ध अजूनही थांबलेलं नाहीये. या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. या युद्धादरम्यान इराणच्या मदतीसाठी भारत पुढे आला आहे. संपूर्ण भारतामधून इराणला मानवतावादी मदतीचा ओघ सुरू आहे. जम्मू काश्मीरमधून तर आतापर्यंत इराणला मोठ्या प्रमाणात मदत पाठवण्यात आली आहे. काही जणांनी तर आपले सोन्या-चांदीचे दागिने देखील इराणला मदत म्हणून दिले आहेत. याबद्दल इराणने यापूर्वी एकदा भारताचे आभार मानले होते. मात्र आता इराणचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे भारतीय लोक इराणप्रति आपली सहानुभूती व्यक्त करत आहेत. भारतामधून इराणला मदतीचा ओघ सुरू आहे.विशेष: काश्मीरमधून तर प्रचंड प्रमाणात इराणला मदत करण्यात आली आहे. पण काश्मीरच्या मुद्द्यावर इराणने दुटप्पीपणा दाखवला आहे. काश्मीरमधून इराणला मोठी मदत मिळाल्यानंतर इराणने आपल्या अधिकृत सोशल अकांउटवर काश्मीर जनतेचे आणि भारताचे आभार मानले होते. परंतु त्यानंतर काही पाकिस्तानी लोकांकडून या संदर्भात इराणकडे तक्रार करण्यात आली. काश्मीर हा भारताचा हिस्सा नसल्याचं आपल्या तक्रारीमध्ये पाकिस्तानने म्हटलं, त्यानंतर भारतामधील इराणच्या दुतावासाकडून आपली ही आभार प्रदर्शन करणारी पोस्ट चक्क डिलिट करण्यात आली आहे. इराणच्या या दुटप्पीपणावर आता भारतामधून संताप व्यक्त होत आहे.

काश्मीरच्या लोकांनी इराणला मोठ्या प्रमाणात मदत केली, कोणी पैसे दिले, कोणी सोनं दिलं, कोणी चांदी दिली. एवढंच नाही तर इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली देणारे काही मोठ मोठे पोस्टर देखील काश्मीरमध्ये लावण्यात आले आहेत. मात्र तरी देखील पाकिस्तानच्या दबावामुळे आता इराण काश्मीरला भारताचा भाग माण्यास भीत असल्याचं समोर आलं आहे.

ती पोस्ट डिलिट केली

इराणने युद्धकाळातील मदतीबद्दल एक पोस्ट करून भारतीय लोकांचे आभार मानले होते. काश्मीरमधील एका बहिणीने तिच्या पतीच्या आठवणीत जपून ठेवलेले दागिने मानवतावादी मदत म्हणून इराणला दिले, भारतीय लोकांचं प्रेम आणि इराणप्रति असलेल्या त्यांच्या सद्भावना हा आमच्या ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे, धन्यवाद काश्मीर, धन्यवाद भारत असं इराणने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. मात्र त्यानंतर इराणकडून ही पोस्ट डिलिट करण्यात आली आहे.

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी