AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Richest Comedian : कपिल शर्मा ना जॉनी लिव्हर, कमाईत नंबर वन, हा कॉमेडियन!

Richest Comedian : भारतीय चित्रपट सृष्टीत विनोदवीरांची कमी नाही. तर विनोद ओसंडून वाहणाऱ्या चित्रपटांची संख्या पण कमी नाही. हसवून हसवून या विनोदवीरांनी जोरदार कमाई केली आहे. कमाईत हा कॉमेडियन नंबर वन आहे.

Richest Comedian : कपिल शर्मा ना जॉनी लिव्हर, कमाईत नंबर वन, हा कॉमेडियन!
| Updated on: Jun 09, 2023 | 3:21 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय चित्रपट सृष्टीत विनोदवीरांची कमी नाही. तर विनोद ओसंडून वाहणाऱ्या चित्रपटांची संख्या पण कमी नाही. हसवून हसवून या विनोदवीरांनी जोरदार कमाई केली आहे. कमाईत हा कॉमेडियन (Richest Comedian) नंबर वन आहे. आता लागलीच तुमच्या डोळ्यांसमोर जॉनी लिव्हर, परेश रावल, राजपाल यादव, कपिल शर्मा, भारती आणि इतर अनेक विनोदी अभिनेत्यांचे चेहरे झळकले असतील. हे देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहेत. त्यांनी हसवून हसवून अफाट संपत्ती पण जमा केली आहे. पण कमाईच्या बाबतीत एक जण या सर्वांवर भारी आहे. कोण आहे हा कॉमेडियन..

बॉलिवूडशी नाही नाते जॉनी लिव्हर, कपिल शर्मा, परेश रावल, भारती आणि राजपाल यादव आपल्याला खळखळून हसवत आहेत.दमदार अभिनय आणि अचुक टायमिंग साधत त्यांनी विनोदाची जी डिलिव्हरी केली, त्याला तोड नाही. लोकांना आनंद वाटत, त्यांचे नैराश्य घालवत हे विनोदवीर काहींसाठी डॉक्टरपेक्षा पण मोठे जीवनदाते ठरले आहेत. हे सर्व जण आज लोकप्रियतेच्या आणि श्रीमंतीच्या शिखरावर आहेत. पण श्रीमंतीचा विचार करता हा अभिनेता सर्वात पुढे आहे. त्याचा बॉलिवूड आणि स्टँडअप कॉमेडियनशी काही पण देणेघेणे नाही.

कोण आहे सर्वात श्रीमंत कॉमेडियन भारतात सर्वाधिक नेटवर्थ असलेला कॉमेडियन दक्षिणात्य आहे. हास्य कलाकार ब्रह्मानंदम (Brahmanandam) यांनी सर्वच विनोदवीरांना मागे टाकलेले आहे. दक्षिण भारतातील जवळपास प्रत्येक दुसऱ्या चित्रपटात ब्रह्मानंदम दिसतात. त्यांचे फॅन फॉलवर्स भारतातच नाही तर जगभर आहे. चीन, जपान, सिंगापूर अशा देशातही ते लोकप्रिय आहेत. आता दक्षिणात्य चित्रपट डब होत असल्याने हिंदीचा प्रेक्षक पण त्यांचा मोठा चाहता आहे. एका चित्रपटासाठी ते दोन कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतात.

विनोदाचा कोहिनूर ब्रह्मानंदम देश-परदेशात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. चित्रपटातील अभिनेता-अभिनेत्रीपेक्षा पण त्यांचे संवाद आणि अदाकारीवर अनेक लोक फिदा आहेत. त्यांना दक्षिण भारतीय सिनेमाचा कोहिनूर मानण्यात येते. आपल्या विनोदशैलीने त्यांनी प्रेक्षकांना लोटपोट केले आहे. चित्रपटगृहात हशा पिकविला आहे. त्यांची एकूण संपत्ती 350 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे.

कपिल शर्मा कपिल शर्मा (Kapil Sharma) स्टँडअप कॉमेडीसाठी ओळखल्या जातो. त्याने काही चित्रपटातही नशीब आजमावले आहे. हजरजबाबी कपिलने अनेकांची मने जिंकली आहे. त्याच्याकडे एकूण 300 कोटींची संपत्ती आहे.

जॉनी लिव्हर जॉनी लिव्हर, बस्स नामही काफी है, असा हा कॉमेडीचा बेताज बादशाह आहे. बॉलिवूडमध्ये गेल्या 3 दशकांपासून जॉनीभाईंनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्यांचे किस्से आणि सीन आजही जनतेच्या मुखपाठ आहेत. त्यांची अदाकारी लोकांच्या मनपटलावर कोरल्या गेली आहे. एका अंदाजानुसार, त्यांच्याकडे एकूण 225 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

परेश रावल अभिनयाचा अष्टपैलू हिरा म्हणजे परेशभाई. सर्वच प्रकारच्या भूमिका त्यांनी अत्यंत हिरारीने वठविल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या कमी अभिनेत्यांमध्ये त्यांचा क्रमांक लागतो. विनोदी भूमिकेत त्यांनी चारचाँद लावले. त्यांच्या बाबूभाई या पात्राने विनोदाचे सर्व रेकॉर्ड गुंडाळले. त्यांच्याकडे 93 कोटींची संपत्ती आहे.

राजपाल यादव अभिनेता राजपाल यादव यांनी विनोदाचं एक वेगळंच रसायन आणलं आहे. त्यांच्या रसरशीत अभिनयाने प्रत्येक पात्र जिवंत केले आहे. त्यांनी अनेक चित्रपटात स्मरणात राहतील अशा भूमिका वठवल्या आहेत. त्यांच्याकडे 50 कोटींच्या घरात संपत्ती आहे.

भारती यादव स्टँडअप कॉमेडीत महिलेने उंच भरारी घेण्याची कामगिरी भारती यादवने केली आहे. तिने कॉमेडीत एक वेगळा ट्रेंड आणला. महिलांच्या विनोदबुद्धीवर टीका करणाऱ्यांना भारती हे अचूक उत्तर आहे. भारतीकडे 23 कोटींच्या घरात संपत्ती असल्याचा अंदाज आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.