AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | इस्त्राईल-हमास युद्धात या नवीन शस्त्राचा वापर, मिसाईल, ड्रोनपेक्षा पण आहे घातक

Israel-Hamas War | हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्राईलने युद्धाची घोषणा केली. आता तर गाझा पट्टीची सर्वच बाजूनी कोंडी करण्यात आली आहे. अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अजूनही त्यांचा शोध घेऊन त्यांना ठार करण्यात येत आहे. या युद्धात आता हमासचं कंबरडं मोडण्यासाठी हे घातक शस्त्र उतरवण्यात येत आहे.

Israel-Hamas War | इस्त्राईल-हमास युद्धात या नवीन शस्त्राचा वापर, मिसाईल, ड्रोनपेक्षा पण आहे घातक
| Updated on: Oct 11, 2023 | 6:28 PM
Share

नवी दिल्ली | 11 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्ध ( Israel-Palestine Crisis) भडकले आहे. हमासने शुक्रवारी अचानक हल्ला केल्यानंतर इस्त्राईलने त्याला जोरदार उत्तर दिले आहे. आता तर चोहो बाजूंनी गाझा पट्टीची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आली आहे. पण या युद्धात एका घातक शस्त्राने हमासचे (Hamas) कंबरडे मोडण्याचा प्लॅन इस्त्राईलने आखला आहे. त्याची जगभर चर्चा सुरु आहे. हमासची सर्वच रसद तोडण्याचे काम इस्त्राईल करत आहे. हमासपर्यंत पैसाच येऊ द्यायचा नाही. त्यांची रसद तोडायची, असं ठरलं आहे. कोणतं आहे हे शस्त्र, त्याचा कसा वापर करण्यात येत आहे. त्याचा काय परिणाम दिसेल?

हमासकडे रसद येते कोठून

हमास या दहशतवादी संघटनेकडे पैसा येतो कोठून असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. जगभरातील अनेक संघटना, काही देश उघडपणे, गुप्तपणे हमासला मदत करतात. काही लोक हमासला डिजिटल रुपात आर्थिक मदत पोहचवत आहे. क्रिप्टोकरन्सीचे जग सगळ्यांनाच माहिती आहे. तर या डिजिटल करन्सीचे जग सर्वांनाच माहिती आहे. त्यामार्फत हमासला रसद पुरवल्या जाते. त्याला पॅराग्लाईडर्स या मॉर्डन टेक्नॉलॉजीचा वापर करुन अटकाव करण्यात येणार आहे. ही रसद तोडण्यात येईल.

कसा होतो वापर

हमासची दुसरी विंग अल-कसम ब्रिगेडने 2019 साली लोकांकडून बिटकॉईनमध्ये देणगी मागितली होती. यासारख्या संघटना इतर डिजिटल करन्सीसोबत पण जोडल्या गेलेल्या आहेत. यामध्ये Dogecoin, Tether आणि USDC यांचा समावेश आहे. क्रिप्टोकरन्सी नेटवर्कच्या व्यवस्थापनातून पण त्यांना फायदा मिळतो. आता अमेरिका आणि इस्त्राईल या डिजिटल करन्सीच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करत आहेत. या करन्सीचा एक्सेस ब्लॉक करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी दोन्ही देशांनी फायनान्स एक्शन टास्क फोर्सची स्थापना केली आहे. मनी लॉड्रिंगचा वापर थांबविण्यासाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.

रसद तोडणार

डिजिटल करन्सीच्या मार्फत हमाससह इतर दहशतवादी संघटनांना मोठी आर्थिक रसद पुरविण्यात येते. त्याच जोरावर या संघटना शस्त्र खरेदी करतात. प्रशिक्षण करतात. इतर मोठा खर्च करतात. आता ही रसद तोडून त्यांचे नेटवर्क कमकुवत करण्याचा प्रयत्न इस्त्राईल आणि अमेरिका करणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.