मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत लगीन गाठ बांधल्यानंतर अमेरिकन गायक निक जोनास अमेरिकेला रवाना झाला आहे. निक पुढील आठवड्यात मुंबईला परतणार आहे. प्रियांका आणि निक हे 1 डिसेंबर रोजी ख्रिश्चन तर 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने लग्नबंधनात बांधले गेले. लग्नानंतर 4 डिसेंबरला दिल्लीत ग्रँड रिसेप्शन झालं. लग्नानंतर आता घरी पाळणा हलण्याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकत्याच […]
निक म्हणाला, "निश्चितच मला कधी ना कधी बाप बनायचं आहे. ते एक खरं स्वप्न आहे, त्या दिशेने मला लवकरच जायचं आहे".
मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत लगीन गाठ बांधल्यानंतर अमेरिकन गायक निक जोनास अमेरिकेला रवाना झाला आहे. निक पुढील आठवड्यात मुंबईला परतणार आहे. प्रियांका आणि निक हे 1 डिसेंबर रोजी ख्रिश्चन तर 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने लग्नबंधनात बांधले गेले. लग्नानंतर 4 डिसेंबरला दिल्लीत ग्रँड रिसेप्शन झालं. लग्नानंतर आता घरी पाळणा हलण्याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत निकने प्रियांकासोबत ‘बेबी प्लॅनिंग’बाबत बिनधास्त माहिती दिली.निक म्हणाला, “निश्चितच मला कधी ना कधी बाप बनायचं आहे. ते एक खरं स्वप्न आहे, त्या दिशेने मला लवकरच जायचं आहे”.मी कमी वयात खूप आयुष्य पाहिलं आहे. मला आशा आहे की मी कधीतरी माझ्या मुलासोबत दिसेन, असं निक म्हणाला.दुसरीकडे प्रियांकालाही लहान मुलांचा लळा आहे. खूप सारी मुलं हवीत, असं प्रियांका एकदा म्हणाली होती. त्यावरुन प्रियांका आणि निक यांची लहान मुलांची आवड लपून राहिलेली नाही.दरम्यान, निक-प्रियांका आपल्या लग्नाच्या आणखी दोन रिसेप्शन पार्टी देणार आहेत. 20 डिसेंबरला मुंबईत बॉलिवूडकरांसाठी रिसेप्शन पार्टी असेल. हॉटेल ताज लँडमध्ये हे रिसेप्शन होईल.त्यापूर्वी 19 डिसेंबरला दिल्लीत फॅमिलीसाठी रिसेप्शन असेल. यापूर्वी दिल्लीतच झालेल्या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली होती.लग्नानंतर प्रियांका आणि निक हे इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये बिझी होते, त्यामुळे त्यांचंच रिसेप्शन बाकी होतं. हे दोघे ईशा अंबानीच्या लग्नात उपस्थित होते.