AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक लढविण्याइतके सुद्धा पैसे नाहीत; निर्मला सीतारमण यांची संपत्ती तरी किती?

Nirmala Sitharaman Networth : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभा निवडणूक 2024 लढण्यासाठी नकार घंटा दिली आहे. त्यामागे त्यांनी दिलेले कारण चर्चेत आहे. निवडणुकी खर्च करण्याइतका निधी नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे. पण त्या किती संपत्तीच्या मालकीण आहेत, माहिती आहे का?

निवडणूक लढविण्याइतके सुद्धा पैसे नाहीत; निर्मला सीतारमण यांची संपत्ती तरी किती?
निर्मला सीतारमण यांची संपत्ती किती?
| Updated on: Mar 28, 2024 | 3:06 PM
Share

देशात लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत आहे. विविध टप्प्यात देशभरात निवडणुकीचा रणसंग्राम होईल. पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्याकडे ही सार्वत्रिक निवडणूक लढविण्यासाठी पुरेसा निधी नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. देशाच्या आर्थिक आरोग्याचा लेखाजोखा ठेवणाऱ्या सीतारमण यांच्याकडे किती संपत्ती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

भाजपने दिला होता पर्याय

निवडणूक लढविण्यासाठी पैसा नसल्याचे कारण देत लोकसभा निवडणुकीत उभे न राहण्याचा निर्मला सीतारमण यांचा पवित्रा सर्वांनाच हैराण करणारा आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश वा तामिळनाडू येथून निवडणूक लढविण्याचा पर्याय दिला होता. पण या निवडणुकीसाठी आपल्याकडे योग तितका निधी नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले आणि निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

इतक्या संपत्तीच्या धनी

  1. 2019 मध्ये निवडणूक आयोगाकडे निर्मला सीतारमण यांनी शपथपत्र दाखल केले होते. त्यात त्यांची एकूण संपत्ती 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तर त्यांच्या डोईवर 30 लाख रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज असल्याचे स्पष्ट केले होते.
  2. PMO च्या संकेतस्थळानुसार, 2022 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केवळ 7,350 रुपयांची रोख होती. तर सर्व बँकांचे मिळून 35,53,666 रुपयांची ठेव होती. अर्थमंत्र्यांनी पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये (PPF) 1,59,763 रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर म्युच्युअल फंडमध्ये त्यांनी 5,80.424 रुपयांची गुंतवणूक केली आहे. पण त्यांच्याकडे कोणतीही विमा पॉलिसी नाही.
  3. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या संपत्तीच्या विवरणात एक गोष्टीचा खस उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे त्यांच्या नावे एक पण कार नाही. तर त्यांच्या नावावर एक बजाज चेतक स्कूटर आहे. त्याची किंमत केवळ 28,200 रुपये आहे.
  4. 2022 मध्ये त्यांच्याकडे एकूण 18,46,987 रुपयांचे दागदागिने आहेत. यामध्ये जवळपास 315 ग्रॅम सोने आहे. आज या सर्व मौल्यवान धातूची किंमत जवळपास 20 लाख रुपयांच्या घरात आहे. तेलंगणातील हैदराबाद येथे त्यांचे एक आलिशान घर आहे. त्याची किंमत 1,70,51,400 रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे हयातनगरमध्ये एक अकृषक जमीन पण आहे. त्याची किंमत 17,08,800 रुपये आहे.

इतके आहे डोईवर कर्ज

  • निर्मला सीतारमण यांच्या डोईवर 5,44,822 रुपयांचे गृहकर्ज
  • तर 2,53,055 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट
  • 18,93,989 रुपयांचे मॉर्गेज कर्ज
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.