AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काहीच मोफत मिळायला नको’, नारायण मूर्ती यांनी टाकला बॉम्ब, या भांडवलशाहीचा केला पुरस्कार

Narayan Murthy | Infosys चे सहसंस्थापक नारायण मूर्ती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. तरुणाईने 70 तास काम करणे आवश्यक आहे. राष्ट्र उभारणीसाठी ते कसे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी दिला आणि देशात एकच गदरोळ उडाला. काहींनी पाठराखण केली, त्यापेक्षा त्याला विरोध जास्त झाला. आता मूर्ती यांनी पुन्हा एक बॉम्बगोळा टाकला आहे.

'काहीच मोफत मिळायला नको', नारायण मूर्ती यांनी टाकला बॉम्ब, या भांडवलशाहीचा केला पुरस्कार
| Updated on: Nov 30, 2023 | 2:01 PM
Share

नवी दिल्ली | 30 नोव्हेंबर 2023 : देशातील आयटी सेक्टरमधील दुसरी सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (N R Narayana Murthy) त्यांच्या बेधडक विधानांनी सध्या चर्चेत आले आहे. तरुणाईने राष्ट्र उभारणीसाठी 70 तास काम करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यावरुन देशात एकच गदारोळ उडाला होता. उद्योग, आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रापासून तर सर्वसामान्यांनी सुद्धा त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. हा भांडवलशाही पिळवणूकीचा प्रकार असल्याची टीका झाला होती. आता त्यांनी ‘ काहीच मोफत देऊ नका’, अशी भूमिका घेतली आहे. मूर्ती यांची बाजू तरी जाणून घेऊयात. त्यांचं नेमकं म्हणणं तरी काय?

मोफत सेवांच्या विरोधात नाही

बेंगळुरु येथील टेक समिट 2023 मध्ये त्यांनी विचार मांडले. देशात सध्या देण्यात येणाऱ्या मोफत सेवेविरोधात आपण नाही. पण सरकार देत असलेल्या मोफत सेवा आणि सबसिडी यांच्या लाभार्थ्यांनी समाजाच्या हितासाठी योगदान दिले पाहिजे. जेव्हा तुम्ही सेवांचा लाभ घेता. सबसिडीचा फायदा मिळवता, तर त्या मोबदल्यात तुम्ही काही तरी परत करण्यास तयार हवे. भारतासारख्या गरीब राष्ट्राला समृद्ध करण्यासाठी दयाळू भांडवलशाहीची (Compassionate Capitalism) गरज असल्याचा पुरस्कार त्यांनी केला.

मी पण गरीब घरातील

नारायण मूर्ती यांना झिरोधाचे सहसस्थांपक निखिल कामथ यांनी फायरसाईट चॅटमध्ये काही प्रश्न विचारले. त्यात मोफत सेवांबाबत त्यांना विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले. आपण फ्री सर्व्हिसच्या विरोधात नाही. पण जे मोफत सेवांचा आणि सबसिडीचा लाभ घेत आहे. त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवण्यात गैर नाही. निदान असा लाभार्थ्यांच्या पुढील पिढ्या, त्यांचा मुलगा, नातू यांनी अधिक चांगल्या शाळांमध्ये चांगली कामगिरी बजावणे, एकूणच समाजात चांगली कामगिरी बजावणे आवश्यक असल्याचे, ही जबाबदारी उचल्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मूर्ती यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय

मूर्ती यांनी त्यांच्या या विधानामागील तर्क समोर आणला आहे. जर एखादे सरकार मोफत वीज पुरवित असेल तर अगोदर प्राथमिक शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती 20 टक्क्यांनी वाढवून दाखवा, तर तुम्हाला ही सेवा देऊ, असे प्रयत्न करायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुक्त बाजार आणि उद्योगीपणा या दोन खांबावर आधारीत भांडवलशाहीच कोणत्याही देशाची गरिबी संपविण्याचे एकमात्र साधन असल्याचे तर्क त्यांनी मांडला.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.