मोठी बातमी! आता बांधकामाच्या पूर्णत्वाशिवाय बिल्डरला ताब्याचा दबाव आणता येणार नाही

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सी विश्वनाथ आणि रामसुरत राम मौर्य यांच्या खंडपीठाने बंगळुरूस्थित रिअल इस्टेट कंपनीला यासंदर्भात आदेश जारी केलाय. खंडपीठाने विकासकाला घर खरेदीदाराला व्याजासह साडेतीन कोटी रुपये परत करण्यास सांगितले.

मोठी बातमी! आता बांधकामाच्या पूर्णत्वाशिवाय बिल्डरला ताब्याचा दबाव आणता येणार नाही

नवी दिल्लीः घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. जर फ्लॅट पूर्णपणे तयार नसेल, तर बिल्डर घर खरेदी करणाऱ्यांना ताबा घेण्यास भाग पाडू शकत नाही, अशी माहिती एनसीडीआरसी अर्थात राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिलीय. जोपर्यंत फ्लॅटसाठी पूर्णत्व प्रमाणपत्र दिले जात नाही, तोपर्यंत बिल्डर ताबा मिळवण्यासाठी दबाव आणू शकत नाही. या निर्णयाचा हजारो गृहखरेदीदारांना फायदा होणार आहे.

घर खरेदीदाराला व्याजासह साडेतीन कोटी रुपये परत करण्याचे आदेश

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सी विश्वनाथ आणि रामसुरत राम मौर्य यांच्या खंडपीठाने बंगळुरूस्थित रिअल इस्टेट कंपनीला यासंदर्भात आदेश जारी केलाय. खंडपीठाने विकासकाला घर खरेदीदाराला व्याजासह साडेतीन कोटी रुपये परत करण्यास सांगितले. गृह खरेदीदाराने व्हिला विकत घेतला होता, परंतु स्थानिक प्राधिकरणाकडून पूर्णत्वाचा दाखला नसल्यामुळे त्याने ताबा देण्यास नकार दिला. नंतर त्यांनी NCDRC कडे तक्रार केली.

दोन वर्षे उशिरा बांधकाम

त्या व्हिलाचे बांधकाम दोन वर्षे उशिराने सुरू असल्याचे तपासणीत समितीला आढळून आले. असे असतानाही बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, बांधकाम व्यावसायिकाने घराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे लिहिलेल्या कागदावर गृह खरेदीदाराने सही करावी, अशी इच्छा होती. खरेदीदारानं तसे करण्यास नकार दिला. जोपर्यंत लेखी कागदपत्रांवर स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत ताबा मिळणार नाही, असे बिल्डरने स्पष्टपणे सांगितले होते. या वादानंतर घर खरेदीदाराने एनसीडीआरसीशी संपर्क साधला होता.

खरेदीदाराने संपूर्ण ईएमआय वेळेवर भरला

सुमन कुमार झा आणि प्रतिभा झा यांनी 2013 मध्ये 3900 स्क्वेअर फूटचा व्हिला बुक केला होता. हा व्हिला निर्माण मंत्री टेक्नॉलॉजी कन्सल्टेशन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे बांधला जाणार होता. बांधकाम व्यावसायिकाने 2015 पर्यंत बांधकाम पूर्ण करून ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. व्हिला खरेदी करण्याच्या योजनेनुसार या जोडप्याने संपूर्ण ईएमआय भरला आहे.

संबंधित बातम्या

7th Pay Commission: 11 लाख कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार, 8100 रुपयांपेक्षा जास्त फायदा, पटापट तपासा

PF चे व्याज खात्यात आले नाही, अशी करा तक्रार, मिस्ड कॉल द्या किंवा SMS द्वारे 1 मिनिटात तपासा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI