AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : शनिवारी सकाळीच सोन्याचा झटका, भाव धाडकन वाढले, ग्राहकांनो आज जपून… जाणून घ्या लेटेस्ट दर

Gold Rate Today 27 June 2026 Latest News Updates in Marathi : देशांतर्गत सोन्याचे लेटेस्ट दर समोर आले असून त्यामुळे ग्राहकांची धास्ती वाढली आहे. आज सोन्याचा दरात मोठा बदल झाला आहे, जाणून घ्या २४ आणि २२ कॅरेट सोन्याचे आजचे दर

Gold Rate Today : शनिवारी सकाळीच सोन्याचा झटका, भाव धाडकन वाढले, ग्राहकांनो आज जपून... जाणून घ्या लेटेस्ट दर
27 जूनच्या सकाळी सोन्याचे दर किती ?
| Updated on: Jun 27, 2026 | 8:29 AM
Share

सोनं-चांदीच्या दरांवर लक्ष ठेऊन असणाऱ्या ग्राहकांसाठी शनिवारची सकाळ फारशी चांगली बातमी घेऊन आलेली नाही. देशात सोन्यातील दरातील घसरण आता थांबली आहे. २७ जूनच्या सकाळी बहुतांश शहरांमध्ये किमती वाढल्या. राजधानी दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४२,९६० रुपयांपर्यंत वाढला. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १,४२,७६० रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमतीने पुन्हा एकदा ४,००० डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून, ‘स्पॉट गोल्ड’चा भाव आता प्रति औंस ४,०७७.६४ डॉलर्सवर पोहोचला आहे.

अमेरिकेतील महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर डॉलर कमकुवत झाला. त्याच वेळी, अमेरिकेतील व्याजदर वाढीबाबतच्या अपेक्षांमध्येही काहीशी नरमाई आली. मे महिन्यात संपलेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत अमेरिकेचा ‘पर्सनल कन्झम्पशन एक्स्पेंडिचर्स’ (PCE) किंमत निर्देशांक ४.१ टक्क्यांनी वाढला.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव किती ?

राजधानी दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,९६० रुपये आहे. २२-कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅम १,३१,०६० रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबई आणि कोलकातामध्ये २२-कॅरेट सोनं हे १,३०,८६० रुपयांना आणि २४-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,७६० रुपये दराने मिळत आहे.

चेन्नईमध्ये सोन्याचे दर सर्वाधिक आहेत. तिथे २४-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४५,१०० रुपये आहे. तर २२-कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,३३,०१० रुपयांवर पोहोचली आहे. आणि पुणे आणि बेंगळुरू ​​या दोन्ही शहरांमध्ये २४-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,७६० रुपये असून आणि २२-कॅरेट सोन्याची किंमत १,३०,८६० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी आहे.

शहर २२  कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) २४ कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 131060 142960
मुंबई 130860 142760
अहमदाबाद 130960 142860
चेन्नई 133010 145100
कोलकाता 130860 142760
हैदराबाद 130860 142760
जयपुर 131060 142960
भोपाळ 130960 142860
लखनऊ 131060 142960
चंदीगड 131060 142960

चांदीचाही ग्राहकांना झटका

सोन्याची किंमत वाढलेली असताना चांदीचे दर तरी खाली घसरतात का याकडे ग्राहकांचं लक्ष होतं, मात्र तिथेही त्यांची निराशा झाली. कारण सोन्याप्रमाणेच चांदीचे दरही वाढले आहेत. २७ जूनच्या सकाळी चांदीचा दर प्रति किलो २,४०,१०० रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट सिल्व्हर’चा दर प्रति औंस ५९.१२ डॉलर्स इतका आहे.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?