AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus 13 बाजारात लाँच होताच केला विक्रीचा विक्रम, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

रॅम आणि स्टोरेज मेमरीनुसार हा स्मार्टफोन ४ मॉडेल्समध्ये बाजारात उपलब्ध आहे. त्यानुसार त्याची किंमतही वेगवेगळी आहे.

OnePlus 13 बाजारात लाँच होताच केला विक्रीचा विक्रम, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
| Updated on: Nov 09, 2024 | 7:43 PM
Share

वनप्लस कंपनीने त्याचा नवा OnePlus 13 हा स्मार्टफोन चीनमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी लाँच केला होता, लाँचिंगनंतर हा स्मार्टफोन घेण्यासाठी अनेक स्मार्टफोन चाहत्यांची गर्दी झाली होती. बघता बघता ३० मिनिटात पहिल्या सेलमध्ये १ लाखांहून अधिक स्मार्टफोनची विक्री करण्यात आली. एका पत्रकार परिषदेत वनप्लस चीनचे अध्यक्ष ली जी यांनी वनप्लस १३ च्या पहिल्या सेलची आकडेवारी जाहीर केली. जो वनप्लस फ्लॅगशिपसाठी एक विक्रमी बाब ठरली आहे. हा स्मार्टफोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे.

OnePlus 13 ची किंमत

रॅम आणि स्टोरेज मेमरीनुसार हा स्मार्टफोन ४ मॉडेल्समध्ये बाजारात उपलब्ध आहे. त्यानुसार त्याची किंमतही वेगवेगळी आहे. जी खालीलप्रमाणे आहे:-

वनप्लस १३ (१२ जीबी + २५६ जीबी) ची किंमत ४, ४९९ चीनी युआन म्हणजेच भारतात ५३, १०० रुपये इतकी आहे.

वनप्लस १३ (१२ जीबी + ५१२ जीबी) ची किंमत ४,८९९युआन (सुमारे ५७,९०० रुपये) इतका आहे.

वनप्लस १३ (१६ जीबी + २५६ जीबी) ची किंमत ५,२९९युआन (सुमारे ६२,६०० रुपये) आहे.

वनप्लस १३ (२४ जीबी + १ टीबी) ची किंमत ५,९९९युआन (सुमारे ७०,९०० रुपये) आहे. हे या स्मार्टफोनचे टॉप मॉडेल आहे.

कंपनीने हे स्मार्टफोन ब्लू (लेदर), ऑब्सिडियन (ग्लास) आणि व्हाईट (ग्लास) रंगात लाँच केले आहेत. लवकरच तो भारतातही लाँच केला जाऊ शकतो.

OnePlus 13 चं स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन अँड्रॉइड १५ वर आधारित कलर ओएएस १५ वर चालतो. तसेच स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिप आणि एड्रेनो ८३० जीपीयू आहे. याच्या डिस्प्लेमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

वनप्लस १३ मध्ये १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.८२ इंचाचा क्वाड एचडी प्लस (१४४० बाय ३१६८ पिक्सल) एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम (नॅनो+नॅनो) सपोर्ट सिस्टिम देण्यात आला आहे.

यात ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि चार मायक्रोफोन आहेत. तसेच कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ५ जी, ४ जी एलटीई, वाय-फाय ६ आणि ब्लूटूथ ५.४ एनएफसी, ड्युअल बँड जीपीएस आणि यूएसबी ३.२ जेन १ टाइप सी पोर्ट चा समावेश केला गेला आहे.

OnePlus 13 कॅमेरा आणि बॅटरी

वनप्लस १३ मध्ये उत्तम फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याला हॅसेलब्लाड ने ट्यून केले आहे. रियर कॅमेऱ्यात ओआयएस आणि एफ / १.६ अपर्चर सह ५० एमपी प्रायमरी कॅमेरा, एफ / २.२अपर्चर सह ५० एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ओआयएस आणि एफ / २.६ सह ५० एमपी पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आहे. फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सेलचा एफ/२.४ अपर्चर कॅमेरा आहे.

स्मार्टफोनमध्ये १०० वॉट फ्लॅश चार्ज (वायर्ड) आणि ५० वॉट फ्लॅश चार्ज (वायरलेस) सपोर्टसह ६००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. फोन रिव्हर्स वायर्ड (५वॉट) आणि रिव्हर्स वायरलेस (१० वॉट) चार्जिंगला सपोर्ट करतो. दमदार फीचर्स देणारा हा एक पॉवरफुल स्मार्टफोन आहे, जो तुम्ही लवकरच भारतीय बाजारात पाहू शकता.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.