AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन फसवणुकीवर सरकारचा लवकरच उतारा; तुमचा चोरलेला पैसा परत मिळणार

Online Banking Fraud | ऑनलाईन फसवणुकीमुळे अनेकांची मोठी रक्कम लुटल्या जाते. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारामुळे जमामुंजी गायब होते. मोठे आर्थिक संकट कोसळते. त्यावर आता केंद्र सरकार जालीम उपाय करण्याच्या तयारीत आहे. काय आहे हा उपाय, काय आहे सरकारचा प्लॅन?

ऑनलाईन फसवणुकीवर सरकारचा लवकरच उतारा; तुमचा चोरलेला पैसा परत मिळणार
| Updated on: Feb 14, 2024 | 2:20 PM
Share

नवी दिल्ली | 14 February 2024 : जगासह देशात पण सायबर फसवणुकीचे प्रकरणं वाढत आहे. प्रत्येक दिवशी देशात कोणाला ना कोणाला ऑनलाईन फसविण्यात येते. त्यामुळे त्याचा कष्टाचा पैसा चोरल्या जातो. अनेकांना मोठा आर्थिक फटका बसतो. सायबर भामटे ओटीपी मागून अथवा इतर मार्गाने फसवणूक करतात. याविरोधात अनेकदा तक्रार होतात. पण ऑनलाईन चोरलेला पैसा काही परत मिळत नाही. पण त्यावर केंद्र सरकार जालीम उपाय करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार सायबर भामट्यांना धडा शिकविण्यासाठी प्लॅन आखत आहे. सरकार बँकांच्या मदतीने नवीन मार्गदर्शक तत्वे आणण्याच्या तयारीत आहे.

काय SOP

बँका आणि आर्थिक संस्था लवकरच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारतीय तपास यंत्रणांना आर्थिक फसवणुकीची प्रकरणांचा उलगडा करणे आणि खात्यांचा मागे काढणे सोपे होणार आहे. या प्रणालीमुळे ज्यांचा पैसा ऑनलाईन चोरी करण्यात आला आहे. तो परत करता येईल.

अर्थमंत्रालयात झाली बैठक

  • याप्रकरणात अर्थमंत्रालयात अधिकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत आर्थिक सेवा विभागाचे (DFS) सचिव आणि बँकांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यावर्षात आर्थिक व्यवहाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे आर्थिक सेवा सुरक्षिततेसंबंधी चिंता व्यक्त करत उपाय योजना करण्यावर भर देण्यात आला आहे.
  • सरकार आणि बँका आता SOP वर काम करणार आहे. SOP विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामाध्यमातून फसवणूकदारांना त्यांचा पैसा परत करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच प्रणाली विकसीत करण्यात येईल. त्यामुळे आर्थिक फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालता येईल. ज्यांची फसवणूक झाली त्यांची रक्कम परत करता येईल.

UPI फसवणुकीची करा तक्रार

युपीआयच्या माध्यमातून चुकीच्या खात्यात रक्कम हस्तांतरीत झाली तर लागलीच यासंबंधीची तक्रार द्या. UPI प्लॅटफॉर्मवर (फोनपे, पेटीएम, गूगल पे ) त्याची माहिती द्या. अशा युपीआय व्यवहारावर तक्रार नोंदवा. तसेच ही रक्कम रिफंड करण्याची विनंती करा. याशिवाय ग्राहकांनी राष्ट्रीय देयके महामंडळाच्या (NPCI) वेबसाईटीवर पण तक्रार करावी.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...