AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँक खातं रिकामे? तरीही पगारातून पैसे काढता येणार, नेमकी सुविधा काय?

अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या बँकेने दिलेल्या विशेष सुविधेचा लाभ घेऊ शकता. या सुविधेचे नाव ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे. याद्वारे ग्राहक आपत्कालीन परिस्थितीत खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही पैसे काढू शकता.

बँक खातं रिकामे? तरीही पगारातून पैसे काढता येणार, नेमकी सुविधा काय?
काय आहे अकाउंट एग्रीगेटर नेटवर्क? ते कसे कार्य करते? सामान्य माणसाला कसा मिळतो लाभ? जाणून घ्या सर्वकाही
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 11:18 AM
Share

नवी दिल्लीः जीवनात बऱ्याचदा कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. कोरोना महामारीच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतेय. नोकरी गमावणे आणि बेरोजगारीसारख्या समस्यांनी अनेक घरे आर्थिकदृष्ट्या कोलमडली आहेत. मात्र आता परिस्थिती पुन्हा सामान्य होत असून, लोकांच्या आर्थिक समस्या दूर झाल्यात. कधी कधी असे घडते की आपल्याला अचानक पैशाची आवश्यकता भासते. परंतु त्यावेळी बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्याचंही आपल्या लक्षात येते.

तुम्ही तुमच्या बँकेने दिलेल्या विशेष सुविधेचा लाभ घेऊ शकता

आणीबाणीच्या अशा परिस्थितीत कोणाकडून पैसे मागायचे हाच एक मोठा कठीण प्रश्न असतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या बँकेने दिलेल्या विशेष सुविधेचा लाभ घेऊ शकता. या सुविधेचे नाव ओव्हरड्राफ्ट सुविधा (Overdraft facility) आहे. याद्वारे ग्राहक आपत्कालीन परिस्थितीत खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही पैसे काढू शकता.

ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे?

ओव्हरड्राफ्ट सुविधा ही बँकांनी त्यांच्या ग्राहकांना पुरवलेली आर्थिक सुविधा आहे, ज्या अंतर्गत खात्यात पैसे नसतानाही तुम्ही तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता. म्हणजेच खात्यात एक रुपया नसला तरी तुम्ही रोख रक्कम काढू शकता. याला ‘ओव्हरड्राफ्ट’ म्हणतात. ग्राहकांसाठी ओव्हरड्राफ्टची मर्यादा निश्चित केली गेलीय, जी त्यांच्या बँकेशी संबंध आणि क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. ग्राहक विहित मर्यादेपर्यंतच पैसे काढू शकतात. ओव्हरड्राफ्ट खात्यातून काढलेल्या या पैशांवर बँक व्याज आकारले जाते.

ज्यांची पत चांगली, त्यांना ही सुविधा मिळेल

ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा तुमचे बँकेशी चांगले आर्थिक संबंध असतात, म्हणजेच तुमच्या खात्याचे रेकॉर्ड चांगले असावे लागतात. जर तुमचे सर्व तपशील पारदर्शक आणि स्पष्ट असतील तर तुम्हाला या सेवेचा लाभ सहज मिळेल. ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी वयोमर्यादा देखील आहे.

कोणत्या बँका ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांसारख्या सरकारी बँका तसेच देशातील सर्वोच्च खासगी बँक ICICI बँक, भारतातील त्यांच्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देते .

ओव्हरड्राफ्ट सेवा वापरून तुम्ही किती पैसे काढू शकता?

ग्राहक बँकिंग सेवेचा वापर करून संकटाच्या काळात त्यांच्या मासिक पगाराच्या तीन पटीपर्यंत आगाऊ पैसे काढू शकतात. प्रत्येक बँकेच्या वेगवेगळ्या मर्यादा असतात, ज्या ग्राहकांच्या आर्थिक पतवर देखील अवलंबून असतात.

बँक किती व्याज आकारते?

ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत घेतलेल्या अॅडव्हान्सवरील व्याजदर बँकनुसार वेगवेगळे असतात. बहुतेक प्रकरणांमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर करून घेतलेल्या अॅडव्हान्सवर 1% ते 3% व्याजदर आकारते.

बँक ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या अटी

या सेवेच्या अटी आणि शर्थी थोड्या किचकट आहेत. सर्वप्रथम भारतातील केवळ निवडक बँका सध्या आपल्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. दुसरे म्हणजे ही सेवा पगारदार व्यक्तींना दिली जाते, ज्यांचे बँकेत सॅलरी अकाऊंट आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बँक खात्यांद्वारे अॅडव्हान्स पैसे देण्यापूर्वी बँक ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरवर एक नजर टाकते. जे ग्राहक बँकेच्या अटींची पूर्तता करतात, ते या बँक सुविधेचा वापर कोणत्याही आर्थिक अडचणीला सामोरे जाण्यासाठी करू शकतात.

ओव्हरड्राफ्ट खाते कसे कार्य करते?

तुमच्याकडे बँक ओव्हरड्राफ्ट खाते असल्यास, तुम्हाला कर्जाप्रमाणेच ओव्हरड्राफ्टची रक्कम दिली जाईल. जर तुम्हाला बँकेकडून ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळाली असेल, तर गरज पडल्यास तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता, जे ओव्हरड्राफ्टमध्ये जाईल. याचा फायदा घेऊन, तुमच्या बँक खात्यातील शिल्लक वाढते आणि जेव्हा तुम्ही ओव्हरड्राफ्ट खात्यात पैसे जमा करता, तेव्हा ही शिल्लक कमी होते. पूर्ण रक्कम परत होईपर्यंत बँक तुमच्याकडून व्याज आकारेल.

मी रक्कम कशी भरू शकतो?

जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा तुम्ही ओव्हरड्राफ्टची थकबाकी भरू शकता. ओव्हरड्राफ्टच्या रकमेवरील व्याज दररोज मोजले जाते, कारण ओव्हरड्राफ्टची रक्कम निर्धारित वेळेनुसार दिली जात नाही. तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करत असताना तुमची थकबाकी कमी होते. ओव्हरड्राफ्ट ही एक प्रकारची अल्पकालीन कर्ज सुविधा आहे. आपत्कालीन परिस्थितीत जर तुम्हाला पैशांची गरज असेल आणि तुम्ही ते लवकरच परत मिळवू शकलात तर त्याचा लाभ घ्या. जर तुम्ही थकीत ओव्हरड्राफ्टची रक्कम भरण्यास असमर्थ असाल तर तुमच्या विद्यमान बचत किंवा चालू खात्यातून पैसे काढण्याचा अधिकार बँकेकडे जाणार आहे.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रासह 3 राज्यांत 1700 रुग्णवाहिकांची BVG मार्फत सेवा, कोण आहेत हणमंतराव गायकवाड?

वॉरंटी आणि गॅरंटीमध्ये काय फरक? वॉरंटीच्या नावाखाली तुम्हाला कोणी फसवले का?

Overdraft facility know how to get money by overdraft facility with zero balance in your bank account

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.