AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Prices : क्रूड ऑईल 2 डॉलर महाग, या शहरात पेट्रोल 113 रुपये लिटर, तुमच्या शहरातील भाव काय

Petrol Diesel Prices : आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय आहे, जाणून घ्या एसएमएसवर

Petrol Diesel Prices : क्रूड ऑईल 2 डॉलर महाग, या शहरात पेट्रोल 113 रुपये लिटर, तुमच्या शहरातील भाव काय
आजचे भाव काय
| Updated on: Jan 18, 2023 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत (Crude Oil Price) पुन्हा वृद्धी दिसून आली. गेल्या 24 तासांत क्रूड ऑईलच्या किंमतीत जवळपास 2 डॉलर प्रति बॅरलची वाढ झाली. त्यामुळे ब्रेंट क्रूडचा भाव 86 डॉलरच्या पुढे गेला. दरम्यान बुधवारी, 18 जानेवारी 2023 रोजी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel Rate) जाहीर केले. यामध्ये देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल 113.20 रुपये प्रति लिटर झाले तर काही भागात हा दर तुमच्या शहरापेक्षा 22 ते 28 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाला. मुंबई, दिल्ली, कोलकत्ता आणि चेन्नई येथील भावात मात्र आज कुठलाही बदल झाला नाही. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय आहेत, जाणून घ्या..

सरकारी तेल विपणन कंपन्यानुसार, बिहारची राजधानी पटणामध्ये पेट्रोल 88 पैशांनी महागले. याठिकाणी पेट्रोलचा दर 108.12 रुपये प्रति लिटर पोहचला. डिझेल 82 पैशांनी वाढले. डिझेलचा भाव 94.86 रुपये लिटर झाला. इतर शहरातील भावातही किंचित वाढ झाली.

राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यात आज पेट्रोल 9 पैशांनी वाढून भाव 113.20 रुपये झाले. तर डिझेल दरात 8 पैशांनी महागले. डिझेल प्रति लिटर 97.98 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल 96.65 तर डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर रुपये आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकत्तामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. ब्रेंट क्रूडचा भाव जवळपास 2 डॉलरने वाढला. हा भाव 86.41 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. डब्लूटीआईचा भाव जवळपास 3 डॉलर वाढून 80.73 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला.

इंधन दरावाढीविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केल्यानंतर केंद्रातील भाजपने आणि भाजप शासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. पण आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती कमी असताना त्याचा भारतीय ग्राहकांना फायदा झालेला नाही.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे (How to check diesel petrol price daily through SMS) जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?