Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाचे भाव जमिनीवर, पेट्रोल-डिझेल मिळणार का स्वस्त

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव घसरल्याचा आज तुम्हाला फायदा होणार का, पेट्रोल-डिझेलचे दर काय

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाचे भाव जमिनीवर, पेट्रोल-डिझेल मिळणार का स्वस्त
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 8:51 AM

नवी दिल्ली : मकर संक्रांतीनंतर पेट्रोल-डिझेलसंबंधी (Petrol-Diesel Price Today) पहिली आनंदवार्ता येऊन धडकली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवडाभरपासून कच्चा तेलाचे (Crude Oil) दर भडकले होते. या दरात आज घसरण झाली. क्रूड ऑईल 1 टक्के घसरले. देशातंर्गत किंमतींवर त्याचा थेट परिणाम दिसणार नाही. परंतु, तेल वितरण कंपन्यांचा खर्च वाढणार नसल्याने भविष्यात इंधन दरवाढीची चर्चा थांबेल. गेल्या सात महिन्यांपासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. मध्यंतरी तेल विपणन कंपन्यांना (Oil Companies) स्वस्तात इंधन मिळाल्याने त्यांचा मोठा तोटा भरून निघाला. परंतु जनता पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याच्या प्रतिक्षेत आहे.

भारतीय तेल विपणन कंपन्यांनी आज, 17 जानेवारी रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे दर अपडेट केले. सकाळी 6 वाजता कंपन्या त्यांचे दर घोषीत करतात. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय किंमती, डॉलर निर्देशांक आणि इतर घटकांचा विचार करण्यात येतो. त्यानंतर या किंमतींमध्ये उत्पादन शुल्क, स्थानिक कर, व्हॅट, पेट्रोल पंप चालकांचे कमिशन आदी जोडून दर जाहीर करण्यात येतात.

नवीन दरानुसार, आज देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्टब्लेअर येथील वाहनधारकांना मिळत आहे. याठिकाणी पेट्रोल 84.10 रुपये तर डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर देण्यात येते. तर सर्वात महाग पेट्रोल राजस्थान जिल्ह्यातील श्रीगंगानगरमधील नागरिकांना खरेदी करावे लागत आहे.

हे सुद्धा वाचा

श्रीगंगगानगर पेक्षा पोर्टब्लेअरमध्ये पेट्रोल 29.39 रुपयांनी स्वस्त आहे. तर डिझेल 18.50 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. इतर शहरांची तुलना केली असता, 20 ते 30 रुपयांचा फरक या किंमतीत दिसून येतो. 22 मेपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलाही बदल झालेला नाही.

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता या प्रमुख शहरांसह इतर शहरातील आजचे दर जाहीर केले आहेत. ब्लूमबर्ग एनर्जी या संस्थेच्या आकडेवारीनुसार,वायदे बाजारात डब्ल्यूटीईचा फेब्रुवारी महिन्यासाठीचा दर 78.78 डॉलर प्रति बॅरल आहे. आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रू़ड 84.46 डॉलर प्रति बॅरल आहे.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे (How to check diesel petrol price daily through SMS) जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

इंधन दरावाढीविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केल्यानंतर केंद्रातील भाजपने आणि भाजप शासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. पण आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती कमी असताना त्याचा भारतीय ग्राहकांना फायदा झालेला नाही.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.