Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? काय आहे खुशखबर, तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव काय

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत काय नवीन अपडेट? तुमच्या शहरातील 1 लिटरचा भाव काय

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? काय आहे खुशखबर, तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव काय
आजचा दर काय
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 8:44 AM

नवी दिल्ली : कच्चा तेलाच्या भावात (Crude Oil Price) सातत्याने चढ-उतार होत आहे. कच्चा तेलाच्या किंमतीत पुन्हा बदल दिसून येत असल्याचा देशात परिणाम दिसू शकतो. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर होत आहे. यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतींबाबत (Petrol-Diesel Price Today) तोडगा निघण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षी 22 मेनंतर देशात इंधनाचे दर वाढलेले नाहीत. इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केल्याचा हा परिणाम होता. तेल विपणन कंपन्यांनी 27 जानेवारी रोजीचे भाव अपडेट केले आहेत. तर आज तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागतील ?

प्रत्येक दिवशी देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर सकाळीच निश्चित करतात. 27 जानेवारी रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) मोठा बदल झाला नाही. दिल्लीपासून मुंबई आणि चेन्नईपासून कोलकत्तापर्यंत दरात मोठी तफावत नाही.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

हे सुद्धा वाचा

आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेलचा भाव 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

अहमदनगर पेट्रोल 106.13 रुपये तर डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर, अकोल्यात पेट्रोल 106.73 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर, अमरावतीत 106.57 तर डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर, औरंगाबाद 107.40 पेट्रोल आणि डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 106.63 तर डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर, नांदेडमध्ये पेट्रोल 108.59 तर डिझेल 95.05 रुपये प्रति लिटर आहे.

जळगावमध्ये पेट्रोल 106.11 आणि डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर, लातूरमध्ये पेट्रोल 107.59 तर डिझेल 94.07 रुपये प्रति लिटर, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.58 आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा भाव 106.38 आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.60 रुपये तर डिझेल 93.12 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.