Petrol-Diesel Price : प्रजासत्ताक दिनी 1 लिटर पेट्रोलसाठी मोजा इतके रुपये, कच्चा तेलाचा काय झाला परिणाम

Petrol-Diesel Price : आज एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी मोजावे लागतील एवढे रुपये

Petrol-Diesel Price : प्रजासत्ताक दिनी 1 लिटर पेट्रोलसाठी मोजा इतके रुपये, कच्चा तेलाचा काय झाला परिणाम
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 8:41 AM

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price Today) काय? इंधनाचे दर घरबसल्या जाणून घेता येतात. त्यासाठी एसएमएस संबंधित तेल विपणन कंपन्यांना (OMCs) पाठविल्यास तुम्हाला आजचे दर कळतात. आज, 26 जानेवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्चा तेलाच्या किंमतीत फारसा फरक दिसत नाही. गुरुवारी या भावात बुधवारपेक्षा जास्त तफावत दिसत नाही. ब्रेंट क्रूडमध्ये (Brent Crude Oil) 0.01 टक्क्यांची वाढ होऊन भावात 86.12 डॉलर प्रति बॅरलवर विक्री होत आहे. डब्ल्यूटीआईमध्ये (WTE) 0.57 टक्क्यांची घसरण झाली आणि हा भाव 80.61 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे. या किंमतीचा भारतातील इंधन दरांवर परिणाम होतो. कंपन्यांनी सकाळीच पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

महाराष्ट्रात पेट्रोल 56 पैशांनी स्वस्त होऊन 109.70 रुपये आणि डिझेल 54 पैशांनी घसरुन 92.49 रुपये झाले आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 72 पैशांनी महाग होऊन 109.10 रुपये प्रति लिटरवर पोहचले. तर डिझेलमध्ये 65 पैशांची वाढ होऊन 94.28 रुपये प्रति लिटरवर पोहचले.

पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 42 तर डिझेल 39 पैशांनी महाग झाले. छत्तीसगढमध्ये इंधन दरात वाढ झाली. इतर राज्यातही पेट्रोल-डिझेलच्या दरात किंचित तफावत दिसून येत आहे. बऱ्याच राज्यात भावात मोठा फरक दिसत नाही.

हे सुद्धा वाचा

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 102.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेलचा भाव 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

अहमदनगर पेट्रोल 105.96 रुपये तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर, अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर, अमरावतीत 107.19 तर डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर, औरंगाबाद 106.77 पेट्रोल आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 106.28 तर डिझेल 92.82 रुपये प्रति लिटर, नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर आहे.

जळगावमध्ये पेट्रोल 107.64 आणि डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर, लातूरमध्ये पेट्रोल 108.04 तर डिझेल 94.51 रुपये प्रति लिटर, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.56 आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा भाव 106.17 आणि डिझेल 92.681 रुपये प्रति लिटर, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.